Crime cases : मुस्लिम असतानाही हिंदू असल्याचे भासवून केली महिलेची विक्री

आणखी तीन महिलांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
police
police esakal

छत्रपती संभाजीनगर : मिटमिटा भागातील दलाल पतीपत्नीसह इतर आरोपींनी ३० वर्षीय महिलेला औरंगाबादेतून पळवून नेत राजस्थानातील एका तरुणाला विक्री केले. तसेच त्याच्याशी विवाह लावल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

विशेष म्हणजे, मुस्लीम पीडितेला हिंदू असल्याचे भासवून ही विक्री करत लग्न लावल्याचेही समोर आले आहे. हे मोठे रॅकेट असून यातील चौघेजण हाती लागले आहेत, अशी माहिती छावणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी ८ मार्चरोजी दिली.

याप्रकरणी महिलेने पोलिसांत धाव घेताच गुन्हा दाखल करुन छावणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या. हारुण खान नजीर खान (४०), त्याची पत्नी शबाना (३६, रा. दोघेही बेरीबाग, हर्सूल) अशी पती-पत्नीची नावे असून बन्सी मुलाजीराम मेघवाल (५०) आणि लिलादेवी जेठाराम मेघवाल (४२, रा. दोघेही बोरानाडा, ता.जि.जोधपूर, राजस्थान) अशी इतर आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी मिटमिटा भागातील ३० वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती घरकाम करते. ती कामाच्या शोधात असल्याचे आरोपी शबाना आणि हारुण यांना माहिती होते. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोपींनी पिडीतेशी जवळीक साधत कामाच्या शोधात ते एका कारमध्ये फुलंब्रीकडे गेले.

दरम्यान जेवणात गुंगीचे औषध टाकून पिडीतेवर रात्रीच्या सुमारास शबानाचा पती हारुणने अत्याचार केला. नंतर तिला घेऊन ते जोधपूर राजस्थानला गेले. तिथे छत्रपती संभाजीनगरातून आणलेल्या तीन महिला होत्या. दरम्यान, १९ नोव्हेंबरच्या रात्री पिडीतेला वेगवेगळ्या हॉटेलात नेत तिच्यावर विविध दिवशी बन्सी, कास मनोज, महावीर आदींनी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पहिल्यांदा विकले तीन लाखांत, नंतर विकतच गेले

दरम्यान पीडितेला आरोपी शबाना, हारुण आणि लिलादेवी मेघवाल यांनी आम्ही सांगेल तसे काम नाही केले तर तुझे अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी दिल्याचेही नमूद केले आहे.

पिडीतेला मारहाण करुन दिनेश ऊर्फ मनिष भादू याच्याशी लग्न लावण्याचे भासवून दोन लाख ८० हजार रुपयांत विक्री केले. त्यांनतरही दोन महिन्यांत तब्बल तीन वेळा पिडीतेला विकले. तीन फेब्रुवारीरोजी तिची आणखी विक्री होणार असल्याचे समजताच पीडितेने पळ काढला. ती कुटूंबियांशी संपर्क करत जोधपूर, इंदूर, मध्यप्रदेशमार्गे शहरात आली.

तीने छावणी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत जोधपूर येथे जाऊन आरोपींना अटक केली. आरोपींना नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई उपनिरीक्षक गणेश केदार, नारायण पायघन, सुमेध पवार, मंगेश शिंदे, मिना जाधव यांनी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

निराधार महिलांना बरोब्बर हेरतात

महिलांना विक्री करणाऱ्या टोळीतील आरोपी हे निराधार, एकट्या, घटस्फोटीत महिलांना हेरतात. त्यांच्याशी सलगी वाढवितात, कामाचे आणि पैशांचे आमिष दाखवितात. नंतर एक दिवस संधी साधत त्यांना पळवून नेऊन विक्री करतात. त्यासाठी आरोपींनी जोधपूर हे ठिकाण निवडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com