
Crime News : विहिरीत आढळला अल्पवयीन मुलाचा मृतदेह; 60 तासानंतर सापडलं धडावेगळं झालेलं शिर
सोयगाव : बहुलखेड्यातील विहिरीतील धडापासून गळून पडलेले शीर अखेर ६० तासांच्या अथक परिश्रमानंतर रविवारी सायंकाळी सात वाजता विहिरीत तळाशी सापडले. या शिराची विना डोळ्यांची कवटीच तळाशी शिल्लक राहिली होती. रात्री उशिरा पुन्हा या शीरची तपासणी करण्यासाठी नागद (ता. कन्नड) येथून तज्ञ पाचारण करण्यात आला होता.
शिर धडा वेगळे झालेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत विहिरीत तरंगताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली होती. अखेर रविवारी सायंकाळी सात वाजता या मृतदेहाचे धडा वेगळी झालेली शीरची विना डोळ्यांची कवटी विहिरीच्या तळाशी आढळून आली. दरम्यान शुक्रवारी विहिरीत तरंगताना आढळून आलेला धडा वेगळे झालेल्या शिरचा कुजलेला मृतदेह अविनाश दगडू तडवी (वय १८ रा. कवली ता सोयगाव) याचा असल्याचे कुटुंबियांनी पटवून दिलेल्या ओळखीने उघड झाले होते.
पोलीस निरीक्षक अनमोल केदार, जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे, कवली गावचे पोलीस पाटील निवृत्ती केंडे व बहुलखेड्याचे पोलीस पाटील चंद्रसिंग राठोड यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिर उपसा सुरू केला होता. मृत अविनाश तडवी हा घरातून निघून गेलेला होता. गावाजवळच असलेल्या बहुलखेडा शिवारात विहिरीत त्याचा शीर नसलेला मृतदेह तरंगताना आढळून आल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली होती.
दरम्यान घटनास्थळी रविवारी सायंकाळी नागदचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निकुंभ यांनी या शीरची तपासणी करून या शीर मधील दात केस व कवटी आदींचे तपासणीसाठी घेवून फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये रात्री उशिरा पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
धडापासून शिर वेगळे कसे झाले
बहुलखेडा शिवारात विहिरीत शुक्रवारी तरंगताना आढळून आलेल्या शिरावेगळा मृतदेह प्रकरणी त्या मृतदेहाचे शीर मृतदेहापासून कसे कटले. या तपासासाठी पोलिसांनी पावले उचलली असून सध्या तरी त्या अठरा वर्षीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी त्या मृतदेहाचे शीर विहिरीत आढळून आले आहे. या शीर आढळल्याची नोंद सोयगाव पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. मात्र, धडापासून शीर वेगळे कसे झाले असावे याचा पोलिस तपास करीत आहे