esakal | शेतीवाद व जुन्या भांडणाच्या कारणांमुळे खून; बारा तासांत तीन आरोपी ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

 crime news

शेतीवाद व जुन्या भांडणाच्या कारणांमुळे खून; बारा तासांत तीन आरोपी ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव (औरंगाबाद): लोहगाव परिसरातील गाढेगावपैठण शिवारातील शेतीवाद व जुन्या भांडणाच्या कारणावरून माजी उपसरपंचाच्या खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बारा तासांत तीन आरोपींना गुन्हे शाखा, बिडकीन पोलिसांनी जेरबंद केले आहे.

गाढेगावपैठण येथील माजी उपसरपंच तथा शेतकरी कांता श्रीपती शिंदे (वय ५०) हे रविवार (ता.२) सकाळी आपल्या शेतवस्तीवरून मित्राच्या पाईपलाईन खोदकामावर गेलेले परतले नव्हते. वडील रात्री घरी आले नाही म्हणून सोमवार ( ता.३) सकाळी मुलाने फोन लावला तर फोन लागत नव्हता. शेतवस्तीपासून पाचशे ते सहाशे मीटर अंतरावरील म्हसोबा पुलाजवळ ब्रम्हगव्हान एमआयडीसी पंपहाऊस रोडकडे कांता शिंदे रोडच्या कडेला मृत अवस्थेत दिसले.

हेही वाचा: चिंताजनक! उमरग्यात महिनाभरात दीड हजारांहून अधिक कोरोना रुग्ण

तात्काळ या बाबत पोलीस पाटील सुनील जगताप यांना कळविले. पोलीस पाटलांच्या खबरीने पैठण उपविभाग आधिकारी गोरख भामरे, बिडकीन पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, फौजदार प्रंशात मुढे, हवालदार गोंविद राऊत, गुन्हे शाखाचे भागवत फुंदे, संदीप सोळंके, गणेश राऊत, मेजर हारिकृष्ण मोरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठवले.

हेही वाचा: Mental health: 'अति विचार टाळून नॉर्मल रहा'

दरम्यान घटना स्थळी एस नावाची कमरपट्टयाची क्लिप व लाकडी दांडा या वस्तू मिळाल्या. गुप्त माहिती आधारे गुन्हे शाखा, बिडकीन पोलिसांनी तपास केला असता अनिल ऊर्फ पप्पू अशोक केदारे, (वय २१), संजय मनोहर केदारे (वय २६), राजेश प्रभाकर केदारे, (वय २३) शेतात लपून बसलेल्या आरोपीना शिताफीने ताब्यात घेत वेगवेगळी विचारपूस करताच आरोपींनी गुन्हा कबूल केला. पुढील तपास बिडकीन पोलीस करत आहे.

loading image
go to top