
Crime News : वहिनी, तुम्ही आवडता म्हणत केला विनयभंग
छत्रपती संभाजीनगर : वहिणी तुम्ही मला खूप आवडता, असे म्हणत एका तरुणाने विवाहितेचा हात धरुन स्वतःकडे ओढत तिचा विनयभंग केला. ही घटना २८ एप्रिलरोजी दिशानगरी परिसरात घडली.
याप्रकरणी २२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार एकाविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संदेश दामोदर पडघण (२२, रा. दिशनानगरीमागे, गोलवाडी) असे त्या आरोपी तरुणाचे नाव आहे. (Marathi Tajya Batmya)
फिर्यादीत म्हटल्यानुसार २२ वर्षीय विवाहिता सदर परिसरात पतीसह राहते. दरम्यान दुपारच्या सुमारास पिडीता ही घरी एकटीच असताना संशयित तरुण संदेश हा तिथे आला आणि त्याने विवाहितेला ‘वहिणी तुम्ही मला खुप आवडतात’ असे म्हणत तिचा हात धरुन स्वतःकडे ओढत विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास उपनिरीक्ष सर्जेराव सानप करत आहेत. (Latest Marathi News)