Crime news : मुलीच्या लग्नासाठी आणलेले २५ हजार रुपये हिसकावून पळ काढला

रिक्षाचालकावर चाकूने वार
Sambhaji Nagar Crime News
Sambhaji Nagar Crime Newsesakal

छत्रपती संभाजीनगर : भाडे घेऊन गेलेल्या रिक्षाचालकाला एकाने चाकूने वार करुन करत मुलीच्या लग्नासाठी आणलेले २५ हजार रुपये हिसकावून पळ काढला. ही घटना २७ एप्रिलरोजी मध्यरात्री शहाबाजार परिसरात घडली. विशेष म्हणजे रिक्षाचालकाने रक्तबंबाळ अवस्थेत पोलिस ठाणे गाठले.

दरम्यान जखमी रिक्षाचालकाला गंभीर अवस्थेत घाटीत दाखल करण्यात आले त्यानंतर पोलिसांनी जबाब घेऊन मारहाण करणाऱ्याविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आदिल चाऊस (रा. शहाबाजार) असे त्‍या मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. तर शेख शौकत शेख नूर (रा.जहांगिर कॉलनी, हर्सूल) असे त्या जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे.

शेख यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार ते मागील २० वर्षापासून रिक्षा चालवून उदरनिर्वाह भागवितात. २७ एप्रिलच्या मध्यरात्री ते शहागंज येथून शहाबाजार भागात भाडे घेऊन गेले होते. तिथे शेख यांना जावेद, सद्दाम हे भेटले. तिघे गप्पा मारत उभे असताना तिथे आरोपी चाऊस आला आणि त्याने शेख यांना अलीम याचे घर दाखव म्हणाला.

त्यावर शेख यांनी मला माहिती नाही असे म्हणताच चाऊसने शेख यांना बेदम मारहाण करत कमरेवर, पार्श्वभागावर चाकूने वार केले. या झटापटीत शेख यांनी बहिणीकडून मुलीच्या लग्नासाठी आणलेले २५ हजार रुपयेही आरोपी चाऊस याने हिसकावून घेत पळ काढला.

दरम्यान फिर्यादी शेख हे जखमेला रुमाल बांधून स्वतः रिक्षा चालवत सिटी चौक पोलिस ठाण्यात आले. तिथे पोलिसांनी त्यांना मेडिकल मेमो देऊन घाटीत दाखल केले. त्यानंतर त्यांच्या जबाबावरुन आरोपी आदिल चाऊसविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे हे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com