Fri, Sept 22, 2023

Crime news : महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल
Published on : 24 April 2023, 6:01 am
छत्रपती संभाजीनगर : शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेवर दबाव आणून जिवे मारण्याची धमकी देत मारहाण करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेला संशयित आरोपी जयकिशन कांबळे (रा. संघर्षनगर, मुकूंदवाडी) याने फोन केला. तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून लक्ष्मी कॉलनी येथे बोलावले.
तक्रारदार महिला व तिची मामेबहिण तेथे पोहचल्यावर त्यांना कारमध्ये बसवून माझ्या सोबत संबंध ठेव, माझ्यासोबत आली नाही तर चाकूने भोसकून टाकील अशी धमकी दिली. त्यानंतर मॉलमध्ये गेल्यानंतर पुन्हा तू मॉलमधून लवकर बाहेर का आली नाहीस, असा जाब विचारत मारहाण केली अशी तक्रार महिलेने दिली. त्यानंतर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.