सिल्लोडमध्ये दिवसाढवळ्या पंचवीस लाख लुटले; दुचाकीला धक्का देऊन पळविली पैशांची बॅग

सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावरील शहरालगतच्या आनंदपार्क परिसरातील घटना
crime update sillod 25 lakh stolen theft case police sbi bank
crime update sillod 25 lakh stolen theft case police sbi banksakal

सिल्लोड : सिल्लोड शहरातील बॅंकेमधून पंचवीस लाख रूपये घेऊन जिनिंगकडे जात असलेल्या जिनिंग कर्मचाऱ्यांच्या दुचाकीचा पाठलाग करित पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात बदमाशांनी कर्मचाऱ्याच्या दुचाकीस खाली पाडून पैशांनी भरलेली बॅग घेऊन पसार झाले.

घटना सोमवार (ता.२७) रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावरील आनंद पार्क परिसरात घडली.मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील नवीन कोटेक्स जिनिंगच्या दोन कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतून पंचवीस लाख रूपयांची रक्कम काढली.

ती घेऊन कर्मचारी जिनिंगकडे जात असतांना कन्नड रस्त्यावरील आनंद पार्क परिसरालगत पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात बदमाशांनी जिनिंग कर्मचाऱ्याच्या दुचाकीस लाथ मारून त्यांना खाली पाडले, जिनिंग कर्मचाऱ्यांनी चोरट्यांसोबत प्रतिकार देखिल केला परंतु पैशानी भरलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले.

घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी ताबडतोब जिनिंग मालकास दिली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तसेच शहराच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी केली. परंतु पोलिसांचा हाती काही लागले नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

तर पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे आवाहन उभे राहिले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरिक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस उपनिरीक्षक बी.व्ही.झिंजुर्डे करित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com