esakal | सोळा वर्षीय मुलीला जबरदस्ती मिठीत घेणे भोवले
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

जिल्ह्यातील १६ वर्षीय मुलीला जबरदस्ती मिठीत घेऊन तिच्याशी लज्जास्पद कृत्य करणारा राजू उर्फ रामू पोपट वाघ (वय २६) याला तीन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश अभिनंदन ज. पाटंगणकर यांनी ठोठावली.

सोळा वर्षीय मुलीला जबरदस्ती मिठीत घेणे भोवले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यातील १६ वर्षीय मुलीला जबरदस्ती मिठीत घेऊन तिच्याशी लज्जास्पद कृत्य करणारा राजू उर्फ रामू पोपट वाघ (वय २६) याला तीन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश अभिनंदन ज. पाटंगणकर यांनी ठोठावली.

पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, १२ जुलै २०१५ ला सायंकाळी राजूने हाक मारून तिला खुणावले. त्याला तिने दाद दिली नाही म्हणून राजू तिच्याजवळ गेला व लज्जास्पद कृत्य केले. मुलीने आरडाओरडा केल्यामुळे राजूने तिथून धूम ठोकली. प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील शरद बांगर यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात पीडितेच्या सहा वर्षीय भाचीची साक्ष महत्त्वाची ठरली.

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने राजूला दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त सक्तमजुरी, तर पोक्सो कायद्याच्या आठ कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी जे. आर. पठाण, शिपाई योगेश ताठे व अॅड. रोशन चाथे यांनी अॅड. बांगर यांना सहाय्य केले. 

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...

loading image