पाचोड-पैठण राज्य महामार्गालगत जाळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

जाळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Crime news
Crime news esakal

पाचोड (जि.औरंगाबाद ) : पाचोड- पैठण राज्य महामार्गावरील थेरगाव (ता.पैठण) येथे रस्त्यालगत बुधवारी (ता.१८) एका तीस ते पस्तीस वर्षीय अनोळखी व्यक्तीचा खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चेहरा व गुप्तांग जाळून मृतदेह पुलाजवळील नदीत ब्लँकेटमध्ये गुंडाळून टाकून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यासंबंधी अधिक माहिती अशी, पाचोड-पैठण राज्य महामार्गावरील थेरगाव जवळील पुलालगत नदी (River) पात्रात असलेल्या खोल नालीत लाल रंगाच्या ब्लँकेटमध्ये गुंडाळून तीस-पस्तीस वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती शेतकऱ्यासह रस्त्याने जाणाऱ्यांनी पाचोड पोलिसांना दिली. (Dead Body Found At Pachod Paithan State Highway In Aurangabad)

Crime news
'काळजी नको ! पुरुन उरेन तुम्हाला, चित्रा वाघ म्हणतात मला'

ही माहिती मिळताच पाचोड (ता.पैठण) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी त्यांच्या सहकाऱ्या समवेत घटनास्थळी धाव घेतली. तोच त्यांना रस्त्याच्या कडेला पुलालगत सभोवताली असलेल्या वेड्या बाभळीच्या गर्द दाट झाडीच्या नदीपात्रातील नालीत खून करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. चेहरा ओळखणे अशक्य झाले. पोलिसांनी बारकाईने घटनास्थळाची पाहणी केली असता मृतदेहाजवळ संशयास्पद कोणतीही वस्तू आढळून आली नाही. शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा दिसुन येत होत्या. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले.

Crime news
OBC Reservation : CM ठाकरेंनी राजीनामा द्यावा - चंद्रकांत पाटील

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी उत्तरणीय तपासणी केली. संबंधित मृताची ओळख पटेपर्यंत मृतदेह औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय रुग्णालयाच्या शितगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप ठुबे आदींनी भेट देऊन पाहणी केली. मृताची अद्याप ओळख पटली नसून पाचोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यु म्हणून घटनेची नोंद केली. या घटनेमुळे सर्वत्र परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चव्हाण, प्रशांत नांदवे, किशोर शिंदे, फेरोझ बरडे करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com