शंभर मुलांमागे १४ मुली कमी!

जन्मदरात पुन्हा घट; शहरातील चित्र चिंताजनक
birth rate of girls central government Aurangabad
birth rate of girls central government Aurangabadsakal

औरंगाबाद : मुलींच्या जन्मदरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काही वर्षांपूर्वी १०० मुलांमागे ९ मुलींचे प्रमाण कमी होते. मात्र २०२१ मध्ये मुलींचा जन्मदर साडेचार टक्क्यांनी घटून ८६.६४ टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यभरात काही वर्षांपूर्वी स्रीभ्रूण हत्येचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यामुळे बेकायदा गर्भलिंग निदान करून मुलगी असेल तर गर्भभात केला जात होता. त्यामुळे मुलींचा जन्मदर घटला.

बीड शहरातील धक्कादायक प्रकारानंतर तत्कालीन सरकारने स्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यभरात बेकायदा सोनोग्राफी सेंटर्स सील करण्याची धडक मोहीम हाती घेतली. या कारवाईनंतर २०१३ मध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ झाली. जन्मदर तब्बल नऊ टक्क्यांनी वाढला होता. ८४ वरून तो ९३ टक्क्यांवर पोचला. दरम्यान २०१४ मध्ये यात परत दोन टक्क्यांनी घट झाली. २०१५ मध्ये मुलींचा जन्मदर ९१.२६ टक्के होता. त्यानंतर ८८ टक्क्यापर्यंत खाली आला. २०२० मध्ये जन्मदर ९१.५२ टक्के एवढा झाला. २०२१ मध्ये यात साडेचार टक्क्यांची घट झाल्याने सध्या मुलींचा जन्मदर हा ८६.६४ टक्क्यांवर आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत शहरात विविध कारणांमुळे ११५ बालके मृत्यूमुखी पडली आहेत. यात मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असून अलीकडे मुलींच्या मृत्यूदरात मात्र घट झाली आहे. २०१९ ते २२० दरम्यान एकूण ७६ मुलांचा मृत्यू झाला. तुलनेत मुलींच्य मृत्यूचा आकडा हा ४२ आहे. २०१९ मध्ये सर्वाधिक ५२ बालकांचा मृत्यू झाला आहे.

पाच वर्षांत लोकसंख्येत सव्वा दोन लाखांची भर

२०११ ते २०१५ या पाच वर्षांत शहराच्या लोकसंख्येत सव्वा दोन लाखांची भर पडली होती. या काळात दोन लाख, २९ हजार, ६२ बालकांचा जन्म झाला. २०१९-२१ दरम्यान शहरात ३३ हजार ५७३ मुले, तर २९ हजार ९११ मुली जन्माला आल्या आहेत, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

मागील तीन वर्षांतील मुलींचा जन्मदर

वर्ष मुले मुली जन्मदर

२०१९ ११,५९६ १०,२३५ ८८.२६

२०२० १२,९९९ ११,८९७ ९१.५२

२०२१ ०८,९७८ ०७,७७९ ८६.६४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com