
डॉ.सुहास जेवळीकर यांचे औरंगाबादेत निधन
औरंगाबाद : ज्येष्ठ साहित्यिक आणि औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भूलतज्ज्ञ विभागाचे माजी विभागप्रमुख डाॅ.सुहास जेवळीकर (Suhas Jewalikar) यांचे निधन झाले. शनिवारी (ता.२६) रात्री उशीरा दीर्घ आजारानंतर वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. डाॅ.जेवळीकर यांचे एमबीबीएस, एमडीचे शिक्षण औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले. याच महाविद्यालयात भूलतज्ज्ञ विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. घाटी रूग्णालयाचे (Ghati Hospital) अधीक्षक म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे काम केले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. (Doctor Suhas Jewalikar Dies In Aurangabad)
हेही वाचा: Video: औरंगाबादेत महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
अखेर शनिवारी रात्री उशीरा त्यांनी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना त्यांची मोलाची मदत होत असे. डाॅ.जेवळीकर हे मराठीतील नामवंत लेखक होते. त्यांची ऐरणीच्या देवा, सभोवार, स्वास्थ्य संवाद, तिरीप, दहशतीची दैनंदिनी (कवितासंग्रह) ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना राज्य शासनाचा वाङ्मयीन पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीच्या वतीने दिला जाणारा इंदिरा संत पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते.
Web Title: Doctor Suhas Jewalikar Dies In Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..