औरंगाबाद : परीक्षार्थीला खाली बसविल्याचे आढळल्यास दंड

दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षण विभागाची बैठक : एक लाखाचा दंड करणार वसूल
Education department meeting
Education department meeting sakal

औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्याने बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी ‘शाळा तेथे परीक्षेचे उपकेंद्र’ असे नियोजन केले. परीक्षेच्या अनुषंगाने मंगळवारी (ता.१५) देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन, माध्यमांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांची आढावा बैठक शिक्षण विभागातर्फे घेण्यात आली.

शिक्षण विभागातर्फे मंगळवारी (ता.१५) घेण्यात आलेल्या बैठकीला खुलताबाद, औरंगाबाद, सोयगाव, गंगापूर, फुलंब्री येथील मुख्याध्यापक, प्राचार्य उपस्थित होते. कोरोनात बहुतेक दिवस शाळा बंदच राहिल्याने आणि कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने बोर्डाने हा पर्याय निवडला आहे. परंतु, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, पारदर्शक पद्धतीनेच परीक्षा घ्यावी, अशी अपेक्षा बोर्डाची आहे. परीक्षा काळात पहिली ते नववीचे वर्ग पूर्णवेळ सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावे.

परीक्षा सुरू असताना शाळा, कॉलजेमधील काहीजण विद्यार्थ्यांना प्रश्‍नांची उत्तरे, कॉपीसाठी सूट देतात. या गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल खडतर बनते. त्यामुळे अशा गैरप्रकाराला आळा घालावा. त्या-त्या विषयाच्या पेपरला विषय शिक्षकांना केंद्रावर मज्जाव करावा. परीक्षा काळात शाळा, विद्यालयांनी सीसीटीव्ही सुरू ठेवावेत; तसेच शिक्षण विभागाला जोडण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रसंगी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, सचिन सोळंके, सोफी लईक अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती.

दहावी, बारावीच्या केंद्र-उपकेंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सुरळीत असावी. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवावा. परीक्षा काळात ज्या केंद्रावर विद्यार्थी खाली बसून पेपर देताना आढळून येईल. त्या शाळा, विद्यालय केंद्राकडून एक लाख रुपये दंड वसूल करून मंडळ मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आला.

Education department meeting
‘गाव तेथे एसटी बस’ची ओळख पुसली...

परीक्षा काळात ‘हात दाखवा, गाडी थांबवा’

मार्च-एप्रिलमध्ये उष्णता वाढलेली असते. या काळात परीक्षा हॉलमध्ये लाईट, फॅन सुरू असावा यासाठी महावितरण अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार; तर अतिदुर्गम अथवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर होऊ नये किंवा प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी ‘हात दाखवा, गाडी थांबवा’ यासाठी एसटी महामंडळाला देखील पत्र देण्यात येणार आहे.

अशा आहेत सूचना

  • परीक्षा केंद्रात प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये लाइट, फॅन आदी सुविधा असाव्यात.

  • एका बेंचवर एक विद्यार्थी, दोन बेंचमध्ये पुरेसे अंतर असावे.

  • परीक्षेपूर्वी केंद्राच्या वर्गखोल्या, स्वच्छतागृहे व संपूर्ण परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण.

  • परीक्षा कालावधी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आवश्यक तेथे साबण, हॅण्डवॉश ठेवावे.

  • प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनद्वारे तापमान चेक करावे, सॅनिटायझर, मास्क वापरासंदर्भात सूचना द्याव्यात.

  • एखाद्या विद्यार्थ्याचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्यास आवश्यक कार्यवाही करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com