
औरंगाबाद : आज साजरी होणार ईद-उल-फित्र
औरंगाबाद - महिनाभर रमजानचे रोजे ठेवल्यानंतर सोमवारी (ता.२) चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी (ता.३) सर्वत्र ईद-उल-फित्र साजरी केली जाणार आहे. त्यासाठी शहर व जिल्ह्यातील सर्व ईदगाह मैदाने, मशीदी सज्ज झाल्या आहेत. कोरोनामुळे दोन वर्षाच्या कालावधीनंतर ईदगाह मैदाने आणि मशिदीत सामुदायिकरित्या (जमातसह) नमाज अदा केली जाणार आहे. औरंगाबादच्या छावणी येथील ईदगाह मैदानावर सकाळी साडेआठ वाजता नमाज होणार आहे. छावणी येथे जवळपास दोन लाख भाविकांना नमाज अदा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात २५ सीसीटीव्ही कॅमेरे ईदगाह कमिटीतर्फे लावण्यात आले आहेत.
सायंकाळी मगरीबच्या नमाजनंतर चंद्रदर्शन झाल्याने सर्वांनी ‘चांद मुबारक’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व मशीदीतून तसेच सोशल मिडीयावरुन मंगळवारी (ता.३) ईद-उल-फित्र साजरी केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच सोशल मिडीया, एकमेकांना फोन करुन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
छावणी मैदानाच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था
छावणीच्या ईदगाहमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक नमाज अदा करण्यासाठी येणार आहे. त्यामुळे ट्रॅफिक व्यवस्थापन आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बारापुल्ला गेटकडून येणाऱ्या भाविकांसाठी मिलिंद कॉलेज परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मकई गेटकडून येणाऱ्या भाविकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.
Web Title: Eid Ul Fitr Will Be Celebrated Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..