देशाच्या फाळणीच्या कटू स्मृतींना केंद्रातर्फे उजाळा

तत्कालीन दंगलीच्या छायाचित्रांचे भरविले प्रदर्शन
Exhibition of photographs of then riots auragnabad
Exhibition of photographs of then riots auragnabad

औरंगाबाद - देशाच्या फाळणीनंतर देशभरात दंगे उसळले. अनेकांचे रक्त सांडले. महिला, तरुणींवर अत्याचार झाले. या कटू आठवणींना केंद्रातील भाजप सरकारने उजाळा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृती दिन म्हणून घोषित केला असून, त्यानिमित्ताने त्याकाळातील विदारक परिस्थितीची छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची एकीकडे तयारी सुरू असताना दुसरीकडे १४ ऑगस्ट १९४७ ला झालेल्या देशाच्या फाळणीनंतर उसळलेल्या दंगलीच्या छायाचित्रांचे सर्वत्र प्रदर्शन भरविले जात आहे. केंद्र शासनाकडूनच यासंदर्भातील छायाचित्रे पाठविण्यात आली आहेत. त्यात तत्कालीन वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेली विदारक परिस्थितीची छायाचित्रे, अत्याचाराच्या बातम्यांच्या संग्रहाचा समावेश आहे. औरंगाबाद महापालिकेने कला दालन, टाऊन हॉल येथे हे प्रदर्शन भरविले आहे. गुरुवारी (ता. ११) ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. नवनीतदास श्रॉफ व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे दीपप्रज्वलन करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त सोमनाथ जाधव, सहायक आयुक्त विक्रम दराडे, वॉर्ड अधिकारी श्री. सुरडकर, वॉर्ड अभियंता श्री. काटकर, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, कला दालनाचे देखरेख करणारे हन्सराज बन्सवाल यांची उपस्थिती होती. या प्रदर्शनात ५२ माहिती फलकाद्वारे फाळणीच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. प्रदर्शन १० ऑगस्ट ते १४ ऑगस्टपर्यंत कार्यालयीन वेळेत नागरिकांसाठी सुरू राहणार आहे. केंद्र शासनाने १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृती दिन म्हणून घोषित केला असून, त्यानुसार छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित छायाचित्र देखील केंद्रातर्फेच पाठविण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार हे प्रदर्शन भरविण्यात आल्याचे प्रशासक डॉ. चौधरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com