कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना मोफत मिळणार... 

Aurangabad news
Aurangabad news

फुलंब्री (औरंगाबाद) : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे अनिवार्य केलेले आहे.

त्यामुळे कर्जमाफीच्या यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार पडताळणी मोफत करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी सोमवारी (ता. दोन) केले. त्यासाठी लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्यास किंवा आपले सरकार सेवा केंद्राची तक्रार आल्यास अशा केंद्रांवर कारवाई करणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. 

फुलंब्री तालुक्यात आतापर्यंत सुमारे चौदा हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्तीच्या यादीत नावे आलेली आहेत. परंतु कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आधार व्हेरिफिकेशन करून घेणे बंधकारक करण्यात आले आहे.

शासनाने मंजूर केलेली कर्जमाफी लाभार्थ्यांना मान्य असल्यास आधार व्हेरिफिकेशन जवळील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन करून घेणे गरजेचे आहे. तसेच शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफीत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आधार पडताळणी निःशुल्क करण्यात येत आहे.

याच्या बदल्यात आपले सरकार सेवा केंद्रचालकांना प्रतिव्यक्ती बारा रुपये मोबदला शासनाकडून दिला जाणार आहे. त्यामुळे कर्जमाफीत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी मोफत आधार पडताळणी करून घ्यावी. कुठल्याही आपले सरकार सेवा केंद्रचालकाने आधार पडताळणीचे पैसे लाभार्थ्यांकडून घेऊ नयेत. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली आधार पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केले आहे.

...अन्यथा सेवा केंद्रावर कार्यवाही 

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक बँकेशी संलग्न करून पडताळणी करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना मोफत आधार पडताळणी करून देण्याची जबाबदारी आपले सरकार सेवा केंद्राची आहे.

कुठल्याही केंद्रचालकाने लाभार्थ्याकडून पैसे घेतल्यास अशा सेवा केंद्रचालकाविरुद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संकेत तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com