वाहनाच्या धडकेत पित्यासह मुलीचा मृत्यू, दौलताबाद घाटातील घटना

00accident_86_29.jpg
00accident_86_29.jpg
Summary

ट्रिपलसीट असल्याने व समोरुन आलेल्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने तिघेही खाली कोसळले.

औरंगाबाद : दुचाकीवर ट्रिपलसीट जाणाऱ्या तिघांना वाहनाने दिलेल्या धडकेत जाधववाडीतील पिता, विवाहित मुलीचा जागीच मृत्यू, तर एक नातेवाईक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (ता.१३) सकाळी अकराच्या सुमारास दौलताबाद घाटातील Daultabad Ghat इको बटालियन कार्यालयाजवळ घडला. यातील जखमीवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) Ghati उपचार सुरू आहेत. मोनिका गणेश रेनवाल (२२), धनेश्वर दामोदर परदेशी (५०, दोघेही रा. जाधववाडी) अशी मृतांची, तर विश्वंभर श्रीकृष्ण मन्हाळ (४५, रा.करमाळा, सोलापूर) असे अपघातातील जखमीचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी रुग्णवाहिकेने जखमी व मृतांना तत्काळ घाटीत हलवले. याबाबत अधिक माहिती अशी की, फुगे विक्रीचा व्यवसाय करत असलेले परदेशी यांची मुलगी मोनिका हिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. तिला एक वर्षांची मुलगी आहे. मोनिका, धनेश्वर व त्यांचे नातेवाईक मन्हाळ हे तिघे रविवारी सकाळी अकराच्या सुमारास दौलताबाद घाटातील इको बटालियन कार्यालयासमोरून दुचाकीने (एम.एच-२०-डीएक्स-७०४०) औरंगाबादच्या Aurangabad दिशेने जात होते. उतार असल्यामुळे विश्वंभर यांच्या दुचाकीची गती वाढली होती. ट्रिपलसीट असल्याने व समोरुन आलेल्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने तिघेही खाली कोसळले. मोनिका आणि धनेश्वर रस्त्याच्या डाव्या बाजूला तर विश्वंभर हे काही अंतरावर जाऊन पडले. हा अपघात होताच वाहन चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली.Father, Daughter Died In Accident At Daultabad Ghat

00accident_86_29.jpg
Corona Updates : मराठवाड्यात ३९७ कोरोनाबाधित, २९ जणांचा मृत्यू

यावेळी मार्गावरुन जाणाऱ्या वाहनधारकांनी घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांना कळविली. पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांच्यासह उपनिरीक्षक दिलीप बचाटे, जमादार शरद बच्छाव यांनी धाव घेत रुग्णवाहिकेने तिघांना घाटीत दाखल केले. यावेळी मोनिका आणि धनेश्वर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर विश्वंभर यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दौलताबाद ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक बचाटे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com