मद्यपी मुलाकडून वडिलांचा खून

आईला त्रास का देतोस, असे म्हणत कोयत्याने केला वार
crime
crimeSakal

केज - आईला त्रास का देतोस, असे म्हणत मद्यपी मुलाने कोयत्याने वार करत वडिलांचा खून केल्याची घटना मंगळवारी (ता.१४) दुपारी दीडच्या सुमारास साळेगाव शिवारार घडली. घटनेनंतर मृतदेह सोयाबीनच्या भुसकटात लपवून आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला. खून केल्याची पोलिसांना माहिती दिल्याने काल खूनाचा प्रकार उघडकीस आला. आरोपी पवन हंकारे यास पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील जवळबन येथील पवन शिवाजी हंकारे (वय २६) हा वडील शिवाजी केशव हंकारे (५५) यांना दुचाकीवर बसवून साळेगाव शिवारात घेऊन गेला. तेथे दोघांनी मद्यपान केले. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. पवन हंकारेने वडिलांना मारहाण करत कोयत्याने वार केले. शिवाजी हंकारे हे नशेत असल्याने प्रतिकार करू शकले नाहीत. अतिरक्तस्राव झाल्याने शिवाजी हंकारे यांचा जागीच मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com