पैठण तालुक्यातील पुलाची दुसरी गोष्ट, नदीमुळे खोळंबते वाहतूक

येळगंगा नदीवर पुल नसल्याने पैठण तालुक्यातील १५ गावांचा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो.
येळगंगा नदीवर पुल नसल्याने पैठण तालुक्यातील १५ गावांचा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो.

लोहगाव (जि.औरंगाबाद) : पैठण (Paithan) तालुक्यातील ७४ जळगाव ते खामजळगाव, शहापूर, मानेगाव दरम्यान दक्षिण वाहिनी येळगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी जनतेमधून होत आहे. पैठण तालुक्याचे (Aurangabad) आमदार संदिपान भूमरे कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister Sandipan Bhumare) आहेत. त्यांनी जर आदेश दिले तर ग्रामस्थांचा अनेक दिवसांपासून प्रलंबित नदीवरील पुलाचे बांधकाम लवकर होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) तालुका सरचिटणीस संदीप लाटे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटेल आहे की, ७४ जळगाव ते खामजळगाव, शहापूर-मानेगावमधून येळगंगा नदी गेलेली असून दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या पुराचे पाणी नदी पात्रात येते.

येळगंगा नदीवर पुल नसल्याने पैठण तालुक्यातील १५ गावांचा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो.
मैं खुश हुआ,म्हणत राज्यपाल कोश्यारींनी छायाचित्रासाठी दिली पोझ

त्यामुळे जळगाव बरोबरच १५ गावांतील ग्रामस्थांच्या दळण-वळणाचा प्रश्न निर्माण होतो. अत्यावश्यक अडचणीच्या काळात ग्रामस्थांना मोठा मनस्ताप होते. तसेच या गावातील शेतकऱ्यांच्या नदी पात्राच्या पलीकडे असलेल्या शेतजमिनी वहिती करण्यासाठी बैलगाडी, अवजारे, यांत्रिकी वाहने घेऊन जाण्यास अडथळा निर्माण होतो. जवळपास नऊ किलोमीटर अंतराचा फेरा मारून शेतात जावे लागते. त्यामुळे वेळ वाया जातो. तर दुसरीकडे ग्रामस्थांना ऐनवेळी तातडीच्या वैद्यकीय उपचार गरजेवेळी खुपच अडचण येते, तेव्हा जिल्हा प्रशासनाने व मंत्री जयंत पाटील यांनी या पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करून पुलाच्या कामास मान्यता मिळवून द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com