बोगस टीईटीधारकांची नोकरी जाणार; परीक्षा देण्यावरही कायमस्वरूपी निर्बंध

औरंगाबाद विभागात पाचशेपेक्षा जास्त बोगस टीईटीधारक
five hundred fake TET holders in Aurangabad lose their jobs Permanent ban on giving exams
five hundred fake TET holders in Aurangabad lose their jobs Permanent ban on giving exams sakal

औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) बोगस शिक्षकांची यादी जाहीर झाली आहे. या बोगस टीईटीधारकांची प्रमाणपत्रे रद्द करून त्यांना टीईटी देण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्याची कारवाई राज्य परीक्षा परिषदेने केली आहे. त्यात औरंगाबाद विभागातील पाचशेपेक्षा जास्त टीईटी प्रमाणपत्रे बोगस असल्याचा अंदाज टीईटीधारकांनी व्यक्त केला आहे. २०१८ आणि २०१९-२०२० मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार करत अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले असल्याचा ठपका सायबर पोलिसांनी दोषारोपपत्रामध्ये ठेवला. या परीक्षेत राज्यभरातील ७,८८० शिक्षकांनी पैसे देऊन पात्रता प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या तपासातून पुढे आली. त्यामुळे १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांची टीईटी परीक्षेच्या मूळ प्रमाणपत्र तपासणीचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला होता. यानुसार औरंगाबाद विभागातील जालना, परभणी, बीड, औरंगाबाद व हिंगोली या पाच जिल्ह्यांतील प्राथमिकचे ६५४ आणि माध्यमिक विभागातील १०७ अशा एकूण ७६१ शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते.

गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने नुकतीच जाहीर केली. संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना या पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आला आहे. तर बोगस पद्धतीने पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. अशा शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत.

गैरप्रकारात सर्वांत जास्त कारवाया औरंगाबाद विभागात करण्यात आल्या होत्या. जालना, बीड, औरंगाबाद व हिंगोली, परभणी या जिल्ह्यातून संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. सध्या केवळ २०१९-२० च्या परीक्षेतील गैरप्रकाराची यादी जाहीर केली आहे. त्यात विभागातील पाचशेपेक्षा जास्त उमेदवारांचे प्रमाणपत्रे बोगस असण्याची शक्यता आहे.

-संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन

विभागातील आकडेवारी

- जिल्हा ------- तपासणीसाठीची प्रमाणपत्रे

- औरंगाबाद ------ ३०८

- जालना --------- ३९

- बीड ----------- ११६

- परभणी --------- २३९

- हिंगोली --------- ५९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com