तब्बल दीडशेवर गावांना पुराचा धोका

जिल्ह्यात दोन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद
maharashtra flood
maharashtra floodsakal media

औरंगाबाद - पावसाळा तोंडावर आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन दरवर्षी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊन वित्तहानी होते. यात दोन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात नदी, नाल्यांच्या काठालगत १६५ गावे असून, त्यांना पुराचा धोका आहे. अतिवृष्टीचा इतिहास बघता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पाच, सहा तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पिके, जनावरे व घरांचे नुकसान झाले. विजेचे खांबही उद्ध्वस्त झाले. जिल्ह्यात एक मोठे धरणे, तर ११२ मध्यम व लघु धरणे आहेत. तसेच अनेक नद्या व नाले आहेत. नदी व नाल्याच्या काठावरील गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसतो. मॉन्सूनसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून तयार केलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यात १६५ गावांना पुराचा धोका आहे.

गोदाकाठावरील तालुके व गावे

पैठण - १८

वैजापूर -१७

गंगापूर- ८

धोका असलेली गावे

औरंगाबाद - १६

पैठण १५

फुलंब्री ७

वैजापूर ३१

गंगापूर २६

खुलताबाद ६

सिल्लोड १०

कन्नड ४८

एकूण- १६५

पुराने बाधित होणारे प्रमुख पूल

गंगापूर तालुका कायगाव येथील नगर रस्ता

पैठण तालुका- पैठण-शेवगाव रस्ताएकूण- १६५

मागील आठ वर्षांतील सरासरी पर्जन्यमान

वर्ष अपेक्षित प्रत्यक्षात पडलेला पाऊस टक्के

२०१२ ६७५.४६ ३७६.२७ ५५.७१

२०१३ ६७५.४६ ६८.८११ ०२.१२

२०१४ ६७५.४६ ४२२.३७ ६.५३

२०१५ ६७५.४६ ५१८.५३ ७३.७७

२०१६ ६७५.४६ ६१७.२८ ९१.३६

२०१७ ६७५.४६ ६०६.६७ ८९.८१

२०१८ ६७५.४६ ३५९.९२ ५३.२९

२०१९ ६७५.४६ ७८८.३९१ १६.७२

२०२० ६७५.४६ ०४५.१७ १४९.९५

२०२१ ६७५.४६ १०९३.५६ १६१.०९

पुरामुळे वेढा पडणारी गावे

पैठण- पैठण शहर, कावसान, दादेगाव-जहांगीर, नायगाव, वडवळी, नवगाव.

वैजापूर- डोणगाव, बाबतारा, लाखगंगा, नांदूरढोक, बाबुळगाव, बाजाठाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com