निसर्गाची किमया! आळूच्या पानाला आले फुल

वाळूज (जि.औरंगाबाद) - आळूच्या पानाला आलेले फुल व कळी. (छायाचित्र  - रामराव भराड वाळूज)
वाळूज (जि.औरंगाबाद) - आळूच्या पानाला आलेले फुल व कळी. (छायाचित्र - रामराव भराड वाळूज) Aloo Leaf/colocasia leaves

वाळूज महानगर (जि.औरंगाबाद) : निसर्ग हा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. त्यात फुलं आणि कळी आली. तर विचारायलाच नको. आपण आजपर्यंत अनेक रंगीबेरंगी फुले पाहिलेली आहेत. मात्र आळुच्या पानाचे (Aloo Leaf/colocasia leaves) फुल किंवा कळी कधी पाहिली का? नाही ना ? मात्र हा निसर्गाचा चमत्कार वाळूज येथे सोमवारी (ता.27) रोजी पाहावयास मिळाल्याने सर्वांना नवल वाटत आहे. ''आले निसर्गाच्या मना तेथे कोणाचे काही चालेना'', या म्हणीप्रमाणे निसर्ग कधी काय किमया करील. हे (Aurangabad) कोणीही सांगू शकत नाही. अशीच एक निसर्गाने केलेली किमया वाळूज येथे सोमवारी पाहावयास मिळाली. सटाणा (ता.वैजापुर) (Vaijapur) येथील राजू शिवलाल राजपूत हे कुटुंबासह वाळूज (Waluj) परिसरातील गणेश वसाहतीत राहतात.

वाळूज (जि.औरंगाबाद) - आळूच्या पानाला आलेले फुल व कळी. (छायाचित्र  - रामराव भराड वाळूज)
Tataची नवीन कार, पाच लाखांमध्ये मिळू शकते Punch SUV

त्यांनी घराच्या परसबागेत अनेक लहान-मोठे झाडे लावलेली आहेत. त्यात आळुची पानेही लावलेली आहेत. या आळूच्या पानाला पाणी घालताना त्यांना निसर्गाने केलेली किमया पाहावयास मिळाली. आळुच्या पानाला फुल व कळी आल्याने त्यांना मोठे नवल वाटले. या आळुच्या पानाच्या फुलाचे आश्चर्य व्यक्त करीत त्यांनी याबाबत सांगितले की, गेल्या चार महिन्यांपूर्वी त्यांनी गावाकडून आळुच्या पानाचे चार-पाच रोपटे आणले. हे रोपटे त्यांनी एका प्लास्टिकच्या कुंडीत लावून परसबागेत ठेवले. गेल्या चार महिन्यापासून राजपूत कुटुंब या आळूच्या पानाला पाणी घालून त्याची जोपासना करत आहे. सोमवारी (ता.27) रोजी अचानक पाणी घालताना राजू राजपूत यांच्या पत्नी तुळसाबाई यांना आळुच्या पानाला आलेलं फुल व कळी आल्याचे दिसले. हा निसर्गाचा चमत्कार त्यांनी पती व मुलांना सांगितला. आळूच्या पानाला फुल व कळी आल्याने ते पाहण्यासाठी राजपूत यांच्या घरी मोठी गर्दी होत आहे.

वाळूज (जि.औरंगाबाद) - आळूच्या पानाला आलेले फुल व कळी. (छायाचित्र  - रामराव भराड वाळूज)
Bharat Band : हिंगोलीत कृषी कायद्यांविरोधात धरणे आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com