esakal | माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Former Justice B. N. Deshmukh

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बलभिमराव नरसिंगराव देशमुख (बी. एन.) देशमुख काटीकर (८५ वर्षे) यांचे शुक्रवारी (ता.२९) पहाटे दीड वाजता औरंगाबादेत निधन झाले. त्यांच्यावर शहरातील एन-६ येथील स्मशानभूमीत सकाळी साडे अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते मागील काही दिवसापासून मुत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते.

माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे निधन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बलभिमराव नरसिंगराव देशमुख (बी. एन.) देशमुख काटीकर (८५ वर्षे) यांचे शुक्रवारी (ता.२९) पहाटे दीड वाजता औरंगाबादेत निधन झाले. त्यांच्यावर शहरातील एन-६ येथील स्मशानभूमीत सकाळी साडे अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते मागील काही दिवसापासून मुत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते.

शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते माजी राज्यसभा सदस्य ॲड. नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे ते भाचे होत. सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात ते वकिली करत असताना राज्य विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. त्यांना तात्यासाहेब या नावानेही ओळखले जाई. नंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. शेतकरी, कष्टकरी कामगार तसेच सामाजिक प्रश्रांवर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले होते.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

माजी न्यायमूर्ती यांचे मूळ गाव काटी (ता.तुळजापूर) जि. उस्मानाबाद हे होते. त्यांचे वडील कै. नरसिंगराव देशमुखही नामवंत वकील होते. न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण सोलापूर आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर मुबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायाला स्व. रामराव आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात केली.

औरंगाबाद खंडपीठ व्हावे ही त्यांची इच्छा
औरंगाबादेत येथे  मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी तेथील मुंबई उच्च न्यायालयातील वकील संघात केलेल्या भाषणात औरंगाबादला खंडपीठाची का आवश्यकता आहे हे, पटवून दिले होते. औरंगाबाद येथे खंडपीठ सुरवात झाल्याबरोबर त्यांनी मुंबई येथील  वकिली व्यवसाय बंद केला आणि औरंगाबादेत वकीलीला प्रारंभ केला.

१९८६ मध्ये न्यायमूर्तीपदी नेमणूक झाली. १९९७ साली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदावरुन म्हणून निवृत्त झाले. निवृत्ती नंतर त्यांनी शासनाचे कोणतेही पद स्वीकारले नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या वकीलीस प्रारंभ केला. त्यांच्या वयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकिली व्यवसाय बंद केला आणि दिल्ली सोडून ते औरंगाबादला स्थायिक झाले. विशेष म्हणजे ते शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषदेचे ६ वर्ष सदस्यही होते. त्यांनी विधान परिषदेचे सदस्य असताना शासनाला अनेक प्रश्नावर धारेवर धरले होते.

हेही वाचा- महत्त्वाची बातमी: कामगारांना पूर्ण पगार मिळालाच नाही, कोर्टाचे दरवाजे ठोठावले अन....

loading image