esakal | वैजापुरचे माजी आमदार आर. एम. वाणी यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

वैजापूर

माजी आमदार आर. एम. वाणी यांचे मंगळवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

वैजापुरचे माजी आमदार आर. एम. वाणी यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैजापुर (औरंगाबाद): अभ्यासू पत्रकार, संपादक, नगराध्यक्ष ते तीन वेळा आमदार राहिलेले आर. एम. वाणी (R. M. Vani) यांचे दुखःद निधन झाले. वाणी यांनी महाराष्ट्र विधानसभा असताना अनेक जनकल्यानाचे प्रश्न सभागृहात मांडले होते. माजी आमदार आर. एम. वाणी यांचे मंगळवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

वाणी यांचे पार्थिव बुधवार (ता.१) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी येवला रोडवरील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. अंतिमयात्रा निवासस्थानाहून येवला रोड - डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा - संकट मोचन हनुमान मंदिर - टिळक रोड - जामा मस्जीद - पाटील गल्ली मार्गे व अंत्यविधी वैजापुर अमरधाम येथे सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे.

loading image
go to top