esakal | Marathwada Rain : मराठवाड्यात ३९ मंडळांत अतिवृष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada Rain : मराठवाड्यात ३९ मंडळांत अतिवृष्टी

Marathwada Rain : मराठवाड्यात ३९ मंडळांत अतिवृष्टी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात मंगळवारी (ता. २८) जोरदार पाऊस झाला होता. बुधवार (ता. २९) सकाळी ११.४७ वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तासात मराठवाड्यातील ३९ मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यातील ३४ मंडळांचा समावेश आहे. हिंगोली २, जालना १ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १ मंडळाचा या मध्ये समावेश आहे.

ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे औरंगाबादेत सर्वाधिक नुकसान झाले. जिल्ह्यात सरसरी ६०.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वैजापुर तालुक्यातील दोन मंडळात शंभर मिलीमिटर पेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या अतिवृष्टीमुळे िजल्ह्यातील सोयाबीन, कापूस तसेच मोसंबी या आदी महत्वाच्या िपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या मंडळांतील पाऊस (मिलिमीटर मध्ये)

पैठण तालुका

पिंपळवाडी ७४.२५

लोहगाव ७२.५०

बिडकीन ६५.२५

विहामांडवा ६७.०

गंगापुर तालुका

गंगापुर ८९.७५

मांजरी ८३.०

भेंडाळा ७६.५०

शेंदुरवादा ९८.२५

तुर्काबाद ७२.२५

हर्सुल ८४.७५

डोणगाव ६७.७५

सिद्धनाथ ८५.७५

वैजापुर तालुका

वैजापुर ६५.२५

खंडाळा ९५.५०

शिवुर १०३.७५

बोरसर ९८.०

लोणी १२७.२५

गारज ७९.५०

महालगाव ९६.०

नागमठाण ९२.०

लोहगाव ८१.२५

कन्नड तालुका

कन्नड ७३.२५

चापानेर ७२.००

देवगाव ७१.५०

चिखलठाणा ७५.७५

पिशोर ६८.२५

नाचनवेल ७६.२५

चिंचोली ८८.५०

करंजखेड ८५.५०

loading image
go to top