एचडीएफसी बँकेला दिड कोटीचा कोणी घातला गंडा

photo
photo

औरंगाबाद : एचडीएफसी बँकेच्या कोकणवाडीच्या शाखेला तब्बल दीड कोटीचा गंडा घातल्याच्या प्रकरणात संशयित महेश पंढरीनाथ सिरसाठ (रा. शिवनेरी हौसिंग सोसायटी गारखेडा) याला पोलिसांनी अटक केली. त्याला ७ मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एम. आंबेकर यांनी दिले. प्रकरणात यापूर्वी दोन जणांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलेली आहे. 
एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष फ्रान्सिस आयवन क्रियाडो (पुणे) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

असे आहेत आरोपी

तक्रारीनुसार बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यावसायिक कर्ज घेऊन मंगेश सिरसाठ (रा. खडकेश्वर), महेश सिरसाठ (रा. शिवनेरी हौसिंग सोसायटी), सचिन बंडुलाल राठोड (रा. गारखेडा), सय्यद जाविद (निकलक, ता. बदनापूर, जि. जालना), मुस्तकीम निसार खान (पीरबाजार रोड), मीना सुभाष औताडे (रा. बजाजनगर), सविता गुलाब हिवर्डे (रा. शरणापूर, पडेगाव), संतोषकुमार बबनराव पाटील (देवळाई परिसर), वाजिद अली खान (रा. सिल्कमिल कॉलनी), मालती राजेंद्र हार्डे (रा. हिवरखेडा रोड, कन्नड, जि. औरंगाबाद), प्रभाकर मधुकर गावंडे (४९, रा. चिकलठाणा), दिनेश बेचारा वाविया (रा. सातारा परिसर), शेख निहाल अहेमद हाजी (रा. किराडपुरा), हसन अमर हैदरा (रा. रोशनगेट) व फकरोद्दीन मोहम्मद (रा. बिस्मिल्ला कॉलनी) यांनी बँकेच्या कोकणवाडी शाखेची एक कोटी ४७ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. 

बनावट कागदपत्रांचा आधार

प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीसह त्याच्या १४ साथीदारांनी बनावट कागदपत्रे व शिक्क्यांचा वापर करून बँकेची एक कोटी ४७ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. महेश सिरसाठ याने १५ जानेवारी २०१६ रोजी पाच लाख रुपये बँकेतून उचलले आहेत. सर्व आरोपींनी साखळी पद्धतीने गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. सिरसाठने बनावट शिक्के-कागदपत्रे कुठून मिळवले, कुणी दिले. गुन्ह्यात बँकेतील अधिकारी किंवा कर्मचार्‍यांनी मदत केली का, याचा तपास करणे आहे. तसेच बनावट शिक्के-कागदपत्रे जप्त करणे बाकी असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com