शेतकऱ्यांना पावसाने मारले, तलाठी सज्जेवर बसून करताहेत पंचनामे

पाचोड(ता.पैठण, जि.औरंगाबाद) : परिसरातील पिके अद्यापही पाण्याखाली आहेत.
पाचोड(ता.पैठण, जि.औरंगाबाद) : परिसरातील पिके अद्यापही पाण्याखाली आहेत.

पाचोड (जि.पैठण) : गेल्या सोळा वर्षानंतर प्रथमच पाचोड (ता.पैठण) (Paithan) परिसरात जोमदार पाऊस होऊन पाण्यासाठी आसुसलेले शेतशिवार सलगरित्या दुसऱ्या वर्षी तृप्त झाले. नदी-नाले खळाळून वाहण्यासोबत अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेकडो जमिनी खरडून गेल्या. विहीरीसह कूपनलिकाही उतू लागल्या. माळरानावरील विहीरी तुडुंब भरल्या. खरीपासह फळबागाचे अतोनात नुकसान झाले. मात्र पाचोडसह (Rain Damage Crops) परिसरातील सर्व 'तलाठी आप्पा' पंचनाम्यासाठी नुकसानग्रस्त शेतात (Aurangabad) जाण्याची तसदी घेण्याऐवजी आपल्या हस्तकामार्फत येथेच बसून पंचनामे उरकत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे खरे नुकसानग्रस्त मूळ उद्देशापासून मुकणार आहे. गत सोळा वर्षांपासून पाचोडसह परिसरात दुष्काळ पाचवीलाच पुजला गेला होता. परिसरातील निम्म्यावर फळबागा चुलीच्या सरपण बनल्या. बहुतांश बागायतदारावर उसतोड कामगार बनण्याचे संकट ओढवले. सततच्या पाणीटंचाईमुळे वर्ष २००६ नंतर कायमचेच तोंडचे पाणी पळाले. वर्षानुवर्षे परिसराची भिस्त टॅंकरच्या पाण्यावर विसंबून राहिली.

पाचोड(ता.पैठण, जि.औरंगाबाद) : परिसरातील पिके अद्यापही पाण्याखाली आहेत.
एकाच दिवशी ६०० कोटींच्या Ola Electric स्कूटर्सची विक्री

पाण्याअभावी घराचे वैभव संपुष्टात येऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला. शेतकऱ्यासह मजुर, व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले गेले. विहीरीवरील अहोरात्र पाणी खेचणारे पंप दीर्घ विश्रांती घेऊ लागले. विहीरीवर फळबागा, तर सोडा साधी माणसांची तहान भागविणे दूरापास्त झाले. ऊस, केळी पाठोपाठ फळबागा नामशेष झाल्याने परिसराला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त झाले. मात्र सतत अवर्षणाच्या गर्तेत सापडलेल्या पैठण तालुक्यावर गतवर्षापासून वरुणराजा भलताच मेहरबान झाला. अन् मागील आठवड्यात पाचोड,आडूळ, थेरगाव, नांदर, कडेठाण, विहामांडवा, हर्षी, दादेगाव हजारे, दावरवाडी, कोळीबोडखा, मुरमा, सोनवाडी, रांजनगाव दांडगा, आडगाव, आंतरवाली खांडी, दाभरुल आदी ठिकाणी नद्या -नाले, तलाव, पाणवठे खळ खळून वाहिले. सर्व पिके जमिनी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. माती खरडून गेल्याने जमिनी उघड्या पडलेल्या दिसत आहे. अनेक विहिरी ढासळल्या. घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. नेहमी पाण्यासाठी बोंबाबोंब असणाऱ्या शेतातील विहीरींच्या जलसाठ्यात कमालीची वाढ होऊन विहीरी पाण्याने तुडुंब भरल्या.

पाचोड(ता.पैठण, जि.औरंगाबाद) : परिसरातील पिके अद्यापही पाण्याखाली आहेत.
निलंगा कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी, कोरोनाचे नियम धाब्यावर

एवढेच नव्हे तर विहीरीसह कूपनलिकाही अति पावसामुळे उतू लागल्या असून आठवडाभरा नंतरही पाण्याखाली गेलेल्या पिकातून पाण्याचे पाट वाहत आहे. हाताने पाणी घेण्याइतपत विहीरीच्या पाण्याची पातळी वाढली. एवढेच नव्हे तर माळरानावरील विहीरीही काठोकाठ भरल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. भूजल पातळी कमालीची वाढल्याने जमीन त्याच्या गर्भातील पाणी बाहेर फेकत आहे. विहीरी, कुपनलीका स्वतःहून बाहेर पाणी सोडत आहे. जलसाठ्यात वाढ झाल्याने सर्वत्र रानोमाळ पिके सडत आहे. शेतकऱ्यांनी बहरलेल्या पिकांची वेळेवर खुरपणी, निंदणी, कोळपणीच्या कामांसह खते देऊन औषधांची फवारणी केली. पिके चांगल्या स्थितीत आली अन् या पावसामुळे कापूस, तूर, मूग, सोयाबीन, बाजरी, मोसंबी आदी पिके हातातून गेली. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. गत सोळा वर्षांपासून होणारा सरासरी इतका पाऊस केवळ सप्टेंबरच्या प्रारंभीच झाला. या पावसामुळे खरीप पिकांची मोठी हानी झाली. हजारो हेक्टर जमिनीवरील माती पावसाच्या पाण्यामध्ये वाहून जाऊन खरिपासह फळबागात पाणी साचल्याने फळबागा संकटात सापडल्या.

पाचोड(ता.पैठण, जि.औरंगाबाद) : परिसरातील पिके अद्यापही पाण्याखाली आहेत.
'श्री'चे जागेवरच विसर्जन, पालिकेचा अनोखा उदगीर पॅटर्न

एकंदरीत पिकांत पाणी साचल्याने शेतजमीनी नापीक होण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. भाजीपाल्यांचेही पाणी साचल्याने नुकसान झाले. पिकांमध्ये पाणी साचल्याने कोबी, मिरची, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर,मोसंबी आदी पिके सडू लागली आहेत. विहीरी तुडुंब भरल्याने त्या शेतातच पाणावल्या जाऊन जमिनीतुन पाणी बाहेर झिरपत आहे. तर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असल्याने पिके पाण्याखाली आहेत. विद्युतपंपाशिवाय विहीरी व बोअरवेल वरून पाणी बाहेर सोडत आहे. शासनाने तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकास गावपातळीवर भेटी देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी तलाठी आप्पा एकाच ठिकाणी बसून पंचनामे उरकत आहे. पाचोड मंडळात सर्वाधिक क्षती होवूनही तलाठी आप्पा अंदाजे पंचनामे उरकत असल्याने अनेकांना अंदाजित अहवालामुळे नुकसान सोसावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com