शेतात नवविवाहित जोडप्याची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांनी केला होता आंतरजातीय विवाह I Beed Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News Waghluj Village

काल सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हे दांपत्य कांदे झाकण्यासाठी शेतात गेले होते.

Beed Crime : शेतात नवविवाहित जोडप्याची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांनी केला होता आंतरजातीय विवाह

आष्टी : पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघळूज (ता. आष्टी) इथं मंगळवारी (ता. २३) घडली. पतीचा मृतदेह काल सायंकाळी तर पत्नीचा मृतदेह आज सकाळी आढळला. कडा येथे उत्तरीय तपासणीनंतर दोघांच्या पार्थिवावर वाघळूज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ईश्वर बबन गुंड (वय ३४) व ऋतुजा बबन गुंड (२४) यांनी काही महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. विवाहानंतर हे दांपत्य मुंबईला गेले होते. तेथून परतल्यावर ते वाघळूज गावात शेती करून उदरनिर्वाह करीत होते. त्यांना तीन महिन्यांची मुलगी आहे.

काल सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हे दांपत्य कांदे झाकण्यासाठी शेतात गेले होते. सायंकाळी उशिरा ईश्वर बबन गुंड यांचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. काही अंतरावरच ऋतुजा बबन गुंड हिचाही अशाच स्थितीतील मृतदेह आज आढळला. दोघांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.

दोघांनी गळफास घेतला की अन्य काही कारण आहे, याचा तपास अंभोरा पोलिस करीत आहेत. दरम्यान, तालुक्यातील चिंचोली येथे काल कर्जाला कंटाळून अंकुश बाबूराव एकशिंगे (४४) या शेतकऱ्याने विष घेऊन मृत्यूला कवटाळले. या घटनेला काही तास उलटताच हा प्रकार उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Aurangabad NewsCrime News