लस न घेता फिराल, तर लागू शकतो दंड

covid 19
covid 19covid 19
Summary

शहरात ४५ वर्षावरील सुमारे साडेचार ते पाच लाख नागरिक आहेत. त्यापैकी पावणे दोन लाखापेक्षा कमी नागरिकांनी आत्तापर्यंत लस घेतली आहे.

औरंगाबाद : कोरोना संसर्ग (Corona Infection) कमी करण्यासाठी लस घेण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. पण शहरातील ४५ वर्षावरील सुमारे तीन लाख नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही. त्यामुळे लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना दंड लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर (Health Officer) यांनी शुक्रवारी (ता. चार)सांगितले. डॉ. पाडळकर पुढे म्हणाल्या, की शहरात ४५ वर्षावरील सुमारे साडेचार ते पाच लाख नागरिक आहेत. त्यापैकी पावणे दोन लाखापेक्षा कमी नागरिकांनी आत्तापर्यंत लस घेतली आहे. उर्वरित तीन लाख नागरिकांनी अद्यापही लस घेतलेली नाही. ४५ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला प्रतिसाद मिळावा म्हणून महापालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार ‘ड्राईन इन’ मोहीम (Drive In Vaccination) राबवली जाणार आहे. दिव्यांग व ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींसाठी नऊ प्रभागात स्वतंत्र केंद्रावर व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांनी लस घेतली नाही आणि ते रस्त्यावर विनाकारण फिरत असतील तर त्यांना दंड लावण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी घेतला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. बाजारपेठ व मुख्य रस्त्यावर महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) नागरिक मित्र पथकाकडून तपासणी करून दंड लावला जाईल, असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. (If Without Taking Corona Vaccine, Then Action Will Take Against Residents)

covid 19
औरंगाबादेत कारमध्येच लसीकरण, सोमवारपासून होणार सुरुवात

यापूर्वी दिला होता इशारा

महापालिकेने यापूर्वीच लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्यांना ५०० रुपये दंड लावण्याचा इशारा दिला होता. पण शासनाने लसीकरणासंदर्भातील नियम बदलल्यामुळे व काही काळ लसींचा तुटवडा जाणवल्याने निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती.

लस ऐच्छिक असताना दंड कसा?

कोरोना (Corona) प्रतिबंधक लस घेण्याचा निर्णय केंद्र शासनाने ऐच्छिक केला आहे. एखाद्याची इच्छा नसेल तर लसीकरण नाकारण्याचा संबंधिताला अधिकार आहे. त्यामुळे महापालिका दंडात्मक कारवाई कशी करू शकते? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com