"इम्तियाज जलील यांनी त्यांच्या पोरांचे नाव औरंगजेब ठेवावे" ; खैरेंचा खोचक टोला - Aurangzeb Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangzeb Controversy

Aurangzeb Controversy : "इम्तियाज जलील यांनी त्यांच्या पोरांचे नाव औरंगजेब ठेवावे" ; खैरेंचा खोचक टोला

Aurangzeb Controversy : छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात इम्तियाज जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकार्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. यावेळी औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. दरम्यान माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जलील यांना खोचक टोला लगावला आहे. 

छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करत एआयएमआयएमने औरंगजेबाचे फोटो झळकावले. औरंगाबाद कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये कुठल्याही पक्षाचे बॅनर नाही मात्र औरंगजेबाचे झळकवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. 

यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, "याचा मी तिव्र निषेध करत आहे. हे सर्व नाटक आहे. छत्रपती संभाजी महाराजंच्या नावाला विरोध करणे चुकीचे आहे. इम्तियाज जलील यांचा जनाधार गेलेला आहे. त्यामुळे ते असे नाटक करत आहेत. मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. त्यामुळे हे षडयंत्र रचण्यात आले आहे. इम्तियाज जलील यांनी त्यांच्या पोराचे नाव औरंगजेब का नाही ठेवलं. एआयएमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवावे. औरंगजेबाने मुस्लिम समाजाला सुद्धा त्रास दिला आहे. त्यांनी मंदिरे तोडले, एवढ प्रेम जलील यांना कसे वाटायला लागले." 


दानवे म्हणाले कारवाई करणार -

रावसाहेब दानवे म्हणाले, "राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात आले आहे. मराठवाड्यात नाही तर देशभरात औरंगजेब क्रूर म्हणून ओळखल्या जाते. अशा माणसाचे फोटो घेऊण कुणी आंदोलन करत असेल तर औरंगजेबाच्या पलीकडील त्यांंची वृत्ती आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होईल. असा विरोध करणे चुकीचे आहे. यांच्यावर कारवाई झाली पाहीजे."