esakal | अंबड-जालना रस्त्यावर ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार ठार

बोलून बातमी शोधा

null

अंबड-जालना रस्त्यावर ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार ठार

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अंबड-जालना महामार्गावरील लालवाडी फाट्याजवळील जगदंबा ढाब्याजवळ ट्रक चालकाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. यात दुचाकी जाग्यावर चक्काचूर झाली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड-जालना महामार्गावरील लालवाडी फाट्याजवळ जगदंबा ढाब्यासमोर सोमवारी (ता.२६) सकाळी पावणेआठ वाजेच्या दरम्यान दुचाकीस्वार रमेश आढे हे (रा.उकळी, ता.जालना) जालन्याहून अंबडकडे येत असताना ट्रक (एमएच १२ एक्यू ८४५०) हा अंबड शहराकडून जालन्याकडे ट्रक भरधाव वेगाने जात असताना ट्रक व दुचाकीची जोराची समोरासमोर धडक झाली. यात आढे यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: ऑक्सिजनअभावी पैठण एमआयडीसीमधील कंपनी बंद, कामगारांवर उपासमारीची वेळ

या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. ट्रक चालक ट्रक जागे सोडुन फरार झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस नाईक रमेश वनवे हे करित आहेत, अशी माहिती ठाणे अंमलदार हर्षवर्धन मोरे यांनी दिली आहे.