भाषाच साधतात सांस्कृतिक सुसंवाद

‘मराठी, कन्नड, तेलगू आणि उर्दू यांचा भाषिक सांस्कृतिक अनुबंध’वर परिसंवाद
Language only way achieve cultural communication
Language only way achieve cultural communicationsakal

उदगीर : भाषा ही अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम आहे. भाषा या सांस्कृतिक सुसंवाद साधत आल्या, असा प्रातिनिधिक सूर ‘मराठी, कन्नड, तेलगू आणि उर्दू यांचा भाषिक सांस्कृतिक अनुबंध’ या विषयावर सहभागी झालेल्या परिसंवादातील वक्त्यांच्या विचारांतून निघाला.

प्रकाश भातंब्रेकर अध्यक्षस्थानी होते. रवींद्र शोभणे, मोहिब कादरी, चंद्रकांत भोंजाळ, मल्लिका कलकोंडा, डॉ. व्ही. एस. माळी यांचा वक्ते म्हणून सहभाग होता. शोभणे यांनी कानडी आणि मराठीचे अनुबंध उलगडून सांगितले. ते म्हणाले, की कानडी ही मराठीची मोठी बहीण आहे. या भाषेला अडीच हजार वर्षे व लिपीला १,९०० वर्षे झाली. ती अभिजात भाषा म्हणून गौरविली गेलेली आहे.

मराठीचा पहिला शिलालेख इ.स. ९३७ साली कर्नाटकात मिळाला. विठ्ठल हे दैवत कर्नाटकातूनच आलेले आहे. मराठी व कानडी या भाषा शतकानुशतकापासून सांस्कृतिक व वाङ्मयीन सुसंवाद साधत आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मल्लिका यांनी तेलगू आणि मराठीचा अनुबंधावर प्रकाश टाकला.

मराठी आणि तेलगूमध्ये अनेक वाक्यप्रचार, म्हणींचा अर्थ सारखाच आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. माळी यांनी कन्नड व मराठीवर भाष्य केले. मराठी साहित्य कन्नडमध्ये अनुवाद व्हायला बेळगाव हा दरवाजा आहे, असे ते म्हणाले. भोंजाळ यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. शैलजा दामरे यांनी केले. आभार डॉ. यादव सूर्यवंशी यांनी मानले.

मराठी-कानडी वाद राजकीयच

मराठी-कानडी वाद फक्त राजकीय आहे, असे परखड मत शोभणे आणि माळी यांनी व्यक्त केले. कन्नडमधील आठ साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यापैकी दोन मराठी आहेत, अशी माहिती माळी यांनी दिली.

उर्दू-मराठी मावस बहिणी

मोहिब कादरी म्हणाले, की उर्दू ही भारतीय भाषा असून, ती कोणत्याही धर्माची नाही. ती इंडो आर्यन भाषेपासून जन्मलेली आहे. तिचा जन्म शौरसेनी अपभ्रंश खडीबोलीतून झाला. हिंदी-उर्दू सख्ख्या बहिणी तर मराठी व उर्दू मावस बहिणी आहेत. अनेक अरबी आणि फारशी शब्द जशाला तसे हिंदी-उर्दूत आहेत तर थोड्याफार फरकाने मराठीतही आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com