esakal | पोलिसांचा छापा, दारुसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

बोलून बातमी शोधा

पोलिसांचा छापा, दारुसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांचा छापा, दारुसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : हेर (ता.उदगीर) येथील वाघोबा चौकात पहाटे सहाच्या सुमारास ग्रामीण पोलिसांच्या पथकाने छापा टाकून लाल रंगाच्या कारमधील १५ बॉक्स देशी दारूसह एक लाख ८३ हजार दोनशे रुपयांचा ऐवज जप्त करून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती, अशी की कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या प्रतिबंध उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलिस अधिकारी डॅयनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अशोक घारगे, पोलीस नाईक नामदेव सारुळे, राहुल गायकवाड, दयानंद सूर्यवंशी, कृष्णा पवार, संतोष शिंदे असे गस्तीवर असताना हेर (ता.उदगीर) येथील वाघोबा चौकात आले असता मंगळवारी (ता.२०) सकाळी सहा वाजता एका गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की एका कारमध्ये दारूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यात येत आहे.

ही बातमी मिळाल्याने त्यांनी वाघोबा चौकात सव्वा सहा वाजता छापा मारला. तेथे एक लाल रंगाची कार (एमएच ०२ बीडी ८७४२) आढळली. त्या कारमध्ये एक जाण मिळुन आला त्याचे नाव रमेश उर्फ छोटू ज्ञानोबा मस्के (वय ३०, रा.बाभळगाव, ता.जि.लातुर, हल्ली मुक्काम वडवळ, ता.चाकूर) असे आहे. कारमध्ये देशी दारू, भिंगरी (संत्रा)चे पंधरा बॉक्स मिळुन आले. या देशी दारू भिंगरी संत्राची एकुण किंमत त्रेचाळीस हजार दोनशे रुपये, एक लाल रंगाची कार होंह्युई कंपनीची कार किंमत अंदाजे एक लाख चाळीस हजार रुपये असे एकुण एक लाख त्र्याऐंशी हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सध्याच्या लॉकडाऊनमध्ये देशी, विदेशी दारूला बंदी घातली असल्याने त्याची प्रभावी अंमलबजावणी पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. यातच चढ्या भावाने चोरट्या मार्गाने दारूची प्रचंड विक्री तालुक्यात होत असल्याची स्थिती आहे. या कारवाईमुळे परिसरात धाबे दणाणले आहेत.