किल्लारी (जि.लातूर) : काही दिवसांपासून येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये (Rural Hospital, Killari) कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण (Corona Vaccination) केले जात आहे. मात्र, त्याची आॕनलाइन बुकिंग ही केवळ पंधरा सेकंदात फुल्ल दाखवत आहे. त्यामुळे तीस हजार लोकसंख्या असलेल्या गावात शंभर टक्के लसीकरण करण्यास वर्ष-दोन वर्ष लागतील, असे चित्र असून, लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे. (Latur Latest News Within Corona Vaccination Registration Full)
येथे दिवसभरात जवळपास शंभरपेक्षा जास्त लसीकरण होते. त्यामध्ये लातूर, निलंगा, उमरगा अशा परगावच्या नागरिकांचीच येथे गर्दी होत आहे. परिसरातील खेडेगावांमध्येसुद्धा लस उपलब्ध नसल्याने तसेच विविध कारणाने किल्लारीत येणाऱ्या नागरिकांचाही ओघ येथील रुग्णालयात सुरू आहे. परगावातील लोक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नोंदणी करीत असल्याने स्थानिकांना लस उपलब्ध होत नाही. दरम्यान, रुग्णालयांमध्ये विचारणा करण्यासाठीही नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य देऊन आॕफलाइन नोंदणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.