esakal | अखेरच्या श्वासापर्यंत 'तो' म्हणत होता की, माझ्या आईवडिलांचे काय होईल?
sakal

बोलून बातमी शोधा

अखेरच्या श्वासापर्यंत 'तो' म्हणत होता की, माझ्या आईवडिलांचे काय होईल?

अखेरच्या श्वासापर्यंत 'तो' म्हणत होता की, माझ्या आईवडिलांचे काय होईल?

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : येथील पंचायत समितीमध्ये वडिलांच्या जागी अनुकंपावर लागलेल्या ३७ वर्षीय तरूण पद्माकर पाटील यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आई-वडिलांना एकुलता व हळव्या मनाचा पद्माकर रूग्णालयात भर्ती झाल्यापासून काही बरे वाईट झाले, तर माझ्या आई-वडिलांचे काय होईल? या ध्यासातच त्यांनी प्राण सोडले. तरूण वयात एकुलता एक मुलाच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. येथील पंचायत समिती कार्यालयात वडील सेवक होते. त्यांच्या जागी अनुकंपाधारक म्हणून पद्माकर पाटील हा सेवक म्हणून पाच- सहा वर्षांपूर्वी लागला होता.

सेवक असला तरी तो केवळ झाडू मारणे अन् साहेबांच्या प्रवेशद्वाराला थांबून आत सोडणे एवढ्या पुरते मर्यादित नव्हता. तर तो उत्कृष्ट वाहनचालकही होता. वरिष्ठ आधिकाऱ्यांची वाहने चालवण्यासाठी जात असे गतवर्षीच्या पहिल्या कोरोना लाटेमध्ये त्यांच्या आईला कोरोना झाला होता. मात्र वेळीच उपचार झाल्याने त्या ठणठणीत झाल्या. आई, वडील, पत्नी, दोन मुले असा त्यांचा परिवार होता. त्यातच सध्या वाढलेल्या कोरोनाच्या संसर्गात पद्माकर पाटील कोरोना बाधित झाला. त्यानंतर लातूर येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आसतांना त्यांचा मृत्यू झाला.

आई वडिलांना एकुलता एक असल्यामुळे यामध्ये आपले काही बरे-वाईट झाले तर आई-वडिलांचे काय होईल? असा एकच ध्यास त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत घेत होता. सध्या आई-वडिलांना सांभाळण्याबाबत समाजात किती विपरीत घटना घडत आहेत. मात्र अखेरपर्यंत आई-वडिलांची काळजीची आशा अपुरीच राहिली. अगदी तरूण वयामध्ये मृत्यू पावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.

निलंगा शहर व तालुक्यात भीषण परिस्थिती : सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून खासगी व सरकारी रुग्णालयात रुग्णासाठी खाटा मिळत नसल्यामुळे रुग्णाची तारांबळ होत आहे. उन्हाची तीव्रता त्यामध्ये असलेल्या तापाची साथ यामुळे निलंगा शहर व तालुक्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्णाची गर्दी दिसत आहे. शिवाय येथील सरकारी रुग्णालयात ही मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असून सर्वच खाटा हाऊसफुल्ल असल्यामुळे रुग्ण भर्ती करून घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. अशा स्थितीत नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. फिजिकल डिस्टन्स पाळा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले आहे.