esakal | lockdown 3: औरंगाबादमध्ये ग्लास उताणाच, दारूसह काय बंद, जाणून घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Liquor ban continues in Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश ‘रेड झोन’मध्ये झाला आहे. पूर्वीप्रमाणेच १७ मेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. 

lockdown 3: औरंगाबादमध्ये ग्लास उताणाच, दारूसह काय बंद, जाणून घ्या...

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : शहरात ‘कोविड-१९’च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच संचारबंदी लागू राहणार आहे. त्याअनुषंगाने रविवारी (ता. तीन) जिल्हाधिकाऱ्यांनी दिशानिर्देश जारी केले. यामध्ये अत्यावश्यक सेवा, कृषिविषयक सेवा उत्पादने यांना सूट देण्यात आली आहे, तर मॉल व बाजारपेठा पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत. दरम्यान, दारू विक्रीलाही परवानगी असणार नाही. 

तिसरे लॉकडाउन सोमवारपासून (ता.चार) सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे ‘ग्रीन’ व ‘ऑरेंज झोन’मध्ये काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे; मात्र ‘रेड झोन’मध्ये संचारबंदी आणखी कडक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश ‘रेड झोन’मध्ये झाला आहे. पूर्वीप्रमाणेच १७ मेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. 

दारूविक्रीला परवानगी नाहीच 
 

औरंगाबाद जिल्हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यात दारूविक्रीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. पूर्वीप्रमाणेच जिल्ह्यात लॉकडाउन असल्याचे
जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले, अशी माहिती पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली.

 HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा
 
जिल्ह्यात या गोष्टींना परवानगी 

 • औषधी दुकाने, दवाखाने 
 • ग्रामीण भागातील सर्व औद्योगिक गतिविधी 
 • नागरी क्षेत्रातील बांधकामे 
 • ग्रामीण भागातील बांधकामांविषयी सर्व बाबींना परवानगी 
 • शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठेतील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने 
 • ग्रामीण भागातील मॉल्सव्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू राहतील 
 • औषधी वैद्यकीय उपकरणे यासाठी दिली जाणारी ई-कॉमर्स सेवा 
 • खासगी कार्यालये ३० टक्के अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरू राहतील 
 • सुरक्षा सेवा, आरोग्य सेवा, कुटुंबकल्याण, पोलिस कारागृह, होमगार्ड, नागरी सुरक्षा 
 • मॉन्सूनपूर्व अत्यावश्यक सर्व प्रकारची कामे 
 • इमारतींचे संरक्षण वॉटरप्रूफिंग, पूरनियंत्रण, इमारतीविषयक धोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरू राहील. 
 • सर्व कृषिविषयक कामे सुरू राहतील 
 • तूर, कापूस खरेदी केंद्र सुरू राहील 
 • भाजीमंडईत शेतकऱ्यांकडून होणारी खरेदी-विक्री 
 • कृषी साहित्य खरेदी-विक्री पुरवठा साखळीतील कृषी साहित्यांची दुकाने 
 • खते, कीटकनाशके, बी-बियाणे खरेदी-विक्री 
 • कापणी, पेरणी सुरू राहील. कृषी यंत्रांचे आंतरराज्य, आंतरजिल्ह्यात अवागमन 
 • दुग्धप्रक्रिया सुरू राहील, संकलन-वितरण सुरू राहील 
 • पशुसंवर्धन पोल्ट्रीफार्म, अंडी उबवणी केंद्र, पशुपालन खाद्यनिर्मिती केंद्र त्यासाठी आवश्यक असलेली वनस्पती इतर कच्च्या मालाच्या पुरवठ्यास परवानगी असणार आहे. 
 • पशुधनाची निवारा केंद्र, गोशाळा सुरू राहतील. 
 • किरकोळ व उत्पादनाचे संकलन वाहतूक व विक्री साठवणुकीस परवानगी राहील. 

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

 
यांना परवानगी राहणार नाही 

 • विमान सेवा, रेल्वेसेवा बंद राहील 
 • राज्य व जिल्ह्याअंतर्गत होणारी वाहतूक 
 • सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, शिकवणीवर्ग बंद राहतील 
 • सर्व सिनेमागृह, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद राहतील 
 • व्यायामशाळा, क्रीडा संकुल, जलतरण, मनोरंजन केंद्रे, प्रेक्षकगृह, बार, सिनेमागृह, मंगल कार्यालय एकत्रित जमण्याची ठिकाणे 
 • सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडाविषयक व मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इतर संमेलने, धार्मिकस्थळे सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद राहतील. 
 • सायकल रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सी कॅब, बस वाहतूक, हेअर सलून, बाजारपेठा, व्यापारी संकुल, सर्व मॉल्स बंद राहतील