esakal | ‘महा’डोलारा डळमळीत; औरंगाबाद, जालन्याची मोठी थकबाकी
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavitaran

‘महा’डोलारा डळमळीत; औरंगाबाद, जालन्याची मोठी थकबाकी

sakal_logo
By
अनिल जमधडे


औरंगाबाद : महावितरणच्या (Mahavitaran Company) दिवसागणिक वाढणाऱ्या थकबाकीने महावितरणचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे. औरंगाबाद आणि जालना (Jalna) जिल्ह्यात ४ हजार कोटी ३८ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. ही थकबाकी वसूल करताना महावितरणची दमछक होत आहे. महावितरणच्या प्रचंड थकबाकीमुळे मंगळवारी (ता. १४) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईतील बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. राज्याच्या ७३ हजार कोटीच्या थकबाकीत औरंगाबाद (Aurangabad) परिमंडळातही मोठी थकबाकी झाल्याने महावितरणची यंत्रणा हतबल झाली आहे. औरंगाबाद परिमंडलात सर्व वर्ग-वारीतील ९ लाख ९७ हजार ७०७ ग्राहकांकडे ४ हजार ६७९ कोटी ३८ लाख रुपयांची प्रचंड थकबाकी झालेली आहे.

हेही वाचा: सिडको वाळूज महानगर येणार महापालिकेत!अभ्यासासाठी संयुक्त समिती

यामध्ये ३ लाख ५६ हजार ५६ कृषिपंप ग्राहकांकडे ३ हजार ६५७ कोटी ८७ लाख रुपये थकबाकी आहे. तर ६ लाख ४१ हजार ६५१ अकृषी ग्राहकांकडे १ हजार २१ कोटी ५१ लाख रुपयांची थकबाकी आहे. एकूण थकबाकीत औरंगाबाद शहर मंडलात २ लाख २ हजार ८३१ ग्राहकांकडे ४ हजार २५५ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. औरंगाबाद ग्रामीण मंडलात ४ लाख ९८ हजार ९४६ ग्राहकांकडे २ हजार ६९५ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. जालना मंडलात २ लाख ९५ हजार ९३० ग्राहकांकडे १ हजार ७२८ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे.

ग्राहकांनी केले दुर्लक्ष
कोरोना काळात एप्रिल २०२० पासून महावितरणच्या वीज बिल थकबाकीसाठी कोणाचाही वीज पुरवठा खंडित न करता कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून सुरळित वीज पुरवठा केला. कोरोना संकटाच्या लॉकडाउननंतर बहुतांश ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे थकबाकीचा डोंगर वाढतच असल्याने महावितरणने थकबाकीसाठी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

खर्चाचा ताळमेळ बसेना
महावितरणला वीज खरेदी, वीज वहन, वीज यंत्रसामुग्री खरेदी, उपकेंद्र निर्मिती, देखभाल व दुरूस्ती, व्यवस्थापन खर्च, बॅकांचे कर्ज व व्याजाची परतफेड आदी खर्चाला सामोरे जावे लागते. मात्र वाढत्या थकबाकीमुळे महावितरणला खर्च भागवणेही कठीण होत आहे. त्यामुळेच थकीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा थकबाकीसाठी खंडित करण्याचे निर्देश महावितरणच्या व्यवस्थापनाने क्षेत्रिय कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते यांना दिलेले आहेत.

तर होणार कारवाई
थकबाकीदार ग्राहकाने थकबाकी न भरता महावितरणची दिशाभूल करून थकबाकी असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा घेतल्याचे महावितरण विशेष भरारी पथकाला फेरतपासणीत आढळून आल्यास ग्राहक व जोडूण देणाऱ्या संबंधिताविरूध्द कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांचे शाखा कार्यालय, उपविभागीय कार्यालयस्तरावर मीटर फेरतपासणीसाठी पथकही नेमण्यात आलेले आहे.

loading image
go to top