हाच तो मराठी तरूण, ज्याने मोदींना सुचवली रेल्वेतल्या रुग्णालयाची आयडिया

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील एका तरुणाची आयडियाची कल्पना कोरोनारूपी महाराक्षसाचा पाडाव करण्यासाठी फलदायी ठरली आहे. कोरोना बधितांसाठी रेल्वेच्या डब्यांचा वापर रुग्णालयातील वॉर्डप्रमाणे वापर करता येऊ शकतो, ही संकल्पना त्यांनी पीएमओ आणि republicindia.in या पोर्टलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवली होती.

कोरोना या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारपुढे आपत्ती व्यवस्थापनाचे मोठे आव्हान होते. रुग्णालयांची मर्यादित संख्या पाहता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यास काय काय उपाययोजना कराव्यात, यासाठी ग्वाल्हेर येथील कपिल गुप्ता या अभियंत्याने republicindia.in हे ऑनलाईन पोर्टल भारत सरकारला तयार करून दिले. तसेच या पोर्टलवर भारतातील नागरिक आपल्या समस्या, उपाय योजना किंवा आवश्यक त्या सूचना केंद्र सरकारकडे पाठवू शकतात, असे आवाहन त्यांनी या पोर्टलद्वारे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली, तेेव्हा टीव्हीवर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. त्या नंतर कोरोना या महामारीच्या सामना करण्यासाठी देशाचे नागरिक म्हणून आपणही काहीतरी मदत करावी, असे मला वाटत होते असे स्वप्नील कडू यांनी "सकाळ"शी बोलतांना सांगितले.

विचार करता करता रेल्वेच्या डब्यांच्या वापर रुग्णालयातील अद्ययावत वॉर्ड म्हणून कसा करता येईल, तेथे असणाऱ्या सर्व सुविधा याविषयी आपण सविस्तर माहिती पीएमओ इंडिया आणि गुप्ता यांच्या पोर्टलवर सेंड केली.

अशी आली कल्पना प्रत्यक्षात

या पोर्टलवर तब्बल 10 हजारांवर सूचना प्राप्त झाल्या आणि त्यातील आपण सुचविलेली ही रेल्वेची रुग्णालयात रूपांतर करण्याची संकल्पना मंजूर करण्यात आल्याचा दावा स्वप्नील कडू यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी मेल केला होता व मेल मिळाल्याचा रिप्लायदेखील त्यांना 22 एप्रिलला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

रेल्वे डब्यांचा रुग्णालय म्हणून वापर करण्यात येत असल्याची माहिती गुप्ता यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिली. त्यामुळे आपण सुचविलेली कल्पना केंद्र शासन राबवित असल्याचा खूप आनंद झाल्याचेही स्वप्नील सांगतात.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रहिवासी असलेले स्वप्नील मुळा येथील एका इंग्रजी शाळेत प्राचार्य म्हणून कार्यरत असल्याचे त्यांनी "सकाळ" शी बोलताना सांगितले. त्यांनी सुचविलेल्या या कल्पनेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com