esakal | पुन्हा साडेसात हजार रुग्णांची भर, मराठवाड्यात कोरोनाचे १५७ बळी

बोलून बातमी शोधा

सध्या प्रत्येक तासाला कोरोनाचे 2 हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

पुन्हा साडेसात हजार रुग्णांची भर, मराठवाड्यात कोरोनाचे १५७ बळी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनामुळे मृतांची संख्या वाढतीच असल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता. २०) १५७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात औरंगाबादेत ३७, लातूर २६, नांदेड २५, उस्मानाबाद २१, परभणी १८, बीड १६, जालना १०, हिंगोलीतील चौघांचा समावेश आहे. दिवसभरात सात हजार ५६५ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; लातूर १४७७, औरंगाबाद १३३७, परभणी १२११, नांदेड ११५७, बीड १०२४, उस्मानाबाद ६४५, जालना ५२९, हिंगोली १८५.

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान २४ जणांचा मृत्यू झाला. त्यात रांजणगाव (ता. वैजापूर) येथील पुरुष (वय ७५), भीमनगर, भावसिंगपुरा येथील पुरुष (५५), पिसादेवी, श्रमिक विहार येथील महिला (६५), भारतनगर, औरंगाबाद येथील पुरुष (३०), बाबुलगाव (ता. वैजापूर) येथील महिला (७०), मुकुंदवाडी येथील पुरुष (७५), उंडणगाव (जि. औरंगाबाद) येथील महिला (५०), कन्नड येथील महिला (५०), रांजणगाव येथील पुरुष (२७), कन्नड येथील महिला (५३), पिसादेवी, हर्सूल येथील महिला (६९), सिडको एन-१ औरंगाबाद येथील महिला (६७), रिठी मोहोल्ला (ता. कन्नड) येथील महिला (२३), प्रिया कॉलनी पडेगाव येथील पुरुष (५६), लेहखेडी (जि. औरंगाबाद) येथील महिला (५५), बीड बायपास, औरंगाबाद येथील पुरुष (६८), सिडको येथील महिला (७०), गोलीगाव (ता. गंगापूर) येथील महिला (६५), रांजणगाव (ता. गंगापूर) येथील पुरुष (७४), पडेगाव येथील पुरुष (५४), कांचनवाडी येथील महिला (६५), कन्नड येथील महिला (७०), पाचोड येथील पुरुष (४५), वैजापूर येथील महिलेचा (६३) समावेश आहे. यासह विविध रुग्णालयांत १३ जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबादेत वाढले १३३७ रुग्ण, १८४० बरे : औरंगाबादेत दिवसभरात १ हजार ३३७ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्‍या संख्या १ लाख ११ हजार ८३० वर पोचली. सध्या १५ हजार ९० जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी १ हजार ८४० रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ९४ हजार ५२३ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, ३७ जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या आता २ हजार २१७ झाली आहे.

कोरोना मीटर (औरगाबाद)

----------

आतापर्यंतचे बाधित १११८३०

बरे झालेले रुग्ण ९४५२३

उपचार घेणारे १५०९

आतापर्यंत मृत्यू २२१७