esakal | Aurangabad : २९ झाडे पडली, १२२ ठिकाणी शिरले पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad : २९ झाडे पडली, १२२ ठिकाणी शिरले पाणी

Aurangabad : २९ झाडे पडली, १२२ ठिकाणी शिरले पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहराला मंगळवारी (ता. २८) गुलाब चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अवघ्या काही तासात २९ झाडे पडली. त्याखाली दबून आठ वाहनांचे नुकसान झाले. नाले ओव्हरफ्लो झाल्याने शहराच्या विविध भागात १२२ ठिकाणी पावसाचे पाणी शिरले. पाच ठिकाणी भिंतीही कोसळल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गुलाब चक्रावादळामुळे शहर परिसरात सोमवारी (ता. २७) रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास पावसाचा जोर एवढा वाढला की, शहरात हाहाकार उडाला. ११ वाजेच्या सुमारास टाऊन हॉल ते औरंगपुरा या भागात जोरदार वाऱ्याचा फटका बसला. त्यामुळे महापालिका मुख्यालय परिसरातील १७ झाडे उन्मळून पडली. त्यात महापालिकेच्या इमारतीची संरक्षण भिंत कोसळली. याठिकाणी पार्क केलेल्या सात वाहनांचे नुकसान झाले आहे. कबाडीपूरा येथील आरोग्य केंद्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. रविंद्रनगर येथील नाल्यावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पाण्यात गेले.

किराडपूरा, नेहरूनगर टाइम्स कॉलनी, यशोधरा कॉलनी, अल्तमश कॉलनी, मध्यवर्ती जकात नाका येथे महापालिका कर्मचारी निवासस्थानात पाणी शिरले. मयूरपार्क, ग्रीन व्हॅली, फराहतनगर, देवगिरीपुरम, मोर्यापार्क, एन-१२, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय,जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान या भागात रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. प्रभाग दोन मधील उदय कॉलनी येथे नाल्याची व घराची भिंत पडली. एसबी कॉलनी, कॉलेजसमोरील झाड कोसळले, जिल्हा परिषद मैदानलगत स्मार्ट सिटी बसस्टॉपवर झाड पडले, औरंपुरा येथे स्वच्छतागृहाच्या बाजूच्या नाल्यामध्ये झाड पडले, दलालवाडीची भिंत कोसळली, बीपीएल गॅलरीत पाणी शिरले, बौध्दवाडा नवजीवन हॉस्पिटल जवळ मारोती वॅगनआरचे नुकसान झाले, बुद्धविहारासमोर झाड पडले, सिल्लेखाना, सब्जीमंडई मधील झाड पडले, घराची भिंत पडली

संरक्षक भिंत कोसळली

प्रभाग पाचमधील सप्तपदी मंगल कार्यालय समोरील सनराईज इंग्लीश स्कूल, एन-८ सिडको येथील नाल्यावरील संरक्षक भिंत कोसळली. कादरिया कॉलनी, एन-६ शिवज्योती कॉलनीतील घरांमध्ये व तळघरात पाणी शिरले होते. प्रभाग सहामध्ये रामनगर, एन-४, गणेशनगर, तापडिया पार्क, विठ्ठलनगर, संघर्षनगर, रामनगर, जयभवानीनगर, एन-३ अजयदिप कॉम्प्लेक्स या भागातील घरांमध्ये पाणी शिरले व रस्त्यावर पाणीच पाणी झाले.

loading image
go to top