दिलासादायक! औरंगाबादेत म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येत घट

शहरात कोरोना म्यूकरमायकोसिसचे रुग्ण कमी होत आहेत. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांचे आकडे दररोज वाढत होते
mucormycosis
mucormycosismucormycosis

औरंगाबाद: म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांची संख्या कमी होत असून, दोन दिवसात या आजारामुळे एकही मृत्यू झाला नसल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान गुरुवारी (ता. २४) नवीन दहा रुग्ण दाखल झाले आहेत.

शहरात कोरोना म्यूकरमायकोसिसचे रुग्ण कमी होत आहेत. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांचे आकडे दररोज वाढत होते. पण गेल्या दोन दिवसात एकही रुग्ण दगावला नाही. तसेच नवीन रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली आहे. बुधवारी (ता. २३) चार तर गुरुवारी नवे सहा रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण सख्या १०५९ एवढी झाली आहे. १२८ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला तर २३० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. उपचार घेऊन बरे झालेले ७०१ रुग्ण आहेत.

mucormycosis
चिंताजनक! मराठवाड्यात सलग दोन दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली

सध्या एमजीएम रुग्णालयात ६८, घाटी रुग्णालय ५३, डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये ३१, एमआयटीमध्ये २६, युनायटेड सिग्मामध्ये १२, देशमुख इंस्टिटयुट ऑफ मॅक्झीलो फिशल सर्जरी अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर येथे सात, कमलनयन बजाज येथे सहा, ऑनियन सिटीकेअर सुपरस्पेशॅलिटी येथे चार, अ‍ॅपेक्समध्ये पाच, धूत हॉस्पिटलमध्ये पाच, जीडीसीएच रुग्णालयात पाच याप्रमाणे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com