esakal | भरमसाठ वीज बिलाचा शॉक,  तरीही तीनशे सोळा कोटी भरलेच  

बोलून बातमी शोधा

photo

-मराठवाड्यात तीनशे सोळा कोटींच्या बिलांचा भरणा
-महावितरणच्या जनजागृतीने सकारात्मक परिणाम 

भरमसाठ वीज बिलाचा शॉक,  तरीही तीनशे सोळा कोटी भरलेच  

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद ः कोरोना संकटाच्या लॉकडाउनमुळे रीडिंग न घेता आल्याने महावितरणने ग्राहकांना चार महिन्यांचे एकत्रित वीज बिल दिले. मात्र हे बील भरमसाठ असल्याच्या तक्रारीनंतर महावितरणने केलेल्या प्रबोधनामुळे मराठवाड्यात तब्बल तीनशे कोटीपेक्षा अधिक रकमेचा भरणा झाला आहे.  
 
वीज बिल जास्त असल्याचा ग्राहकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहकांशी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क, ग्राहक मेळावे, वेबिनार, विशेष मदत कक्ष तसेच प्रसिध्दी पत्रकाद्वारे प्रसिध्दी, व्हीडीओ क्लीप, लोकप्रतिनिधींची भेट व परिसरातील ग्राहकांसाठी माहिती देण्यासाठी व्हॉटसअॅप ग्रुपची मदत घेवून लोकप्रबोधन करण्यात आले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जनजागृती अभियान

जनजागृतीमुळे मराठवाडयातील लघुदाब घरगुती, व्यापारी व औघोगिक १४,००,८७० ग्राहकांनी गेल्या चार महिण्यात ३१६.५५ कोटी रूपये वीज बिलाचा भरणा केला आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती अभियान राबवण्यात आले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वीज बिलाबाबत समाधान

मराठवाडयात औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलात २,१९६ वेबिनार घेवून ग्राहकांचे वीज बिलाबाबत समाधान करण्यात आले. तसेच लोकप्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट घेवून महावितरणकडून देण्यात आलेले वीज बिल बरोबर असल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांनी  शहानिशा करून पटवून दिले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

२ टक्के सवलत देण्यात आली

लॉकडाउन कालावधीतील वीज बिलाचा एकरकमी भरणा केल्यास २ टक्के सवलत देण्यात आली आहे. ग्राहकांना बिले भरण्यासाठी हप्तेही पाडून देण्यात येत आहेत. औरंगाबाद परिमंडलातील ५,३९,४४० ग्राहकांनी १२५.०१ कोटी रूपयांचा भरणा केला आहे. लातूर परिमंडलातील ४,६१,९२०  ग्राहकांनी ९९.६५ कोटी रूपयांचा भरणा केला आहे. नांदेड परिमंडलातील ३,९९,५१० ग्राहकांनी ९१.८९ कोटी रूपयांचा भरणा केला आहे.

अशी आहे परिमंडल निहाय स्थिती

परिमंडल            ग्राहक              भरणा केलेली रक्कम (कोटीमध्ये)  
औरंगाबाद         ५,३९,४४०              १२५.०१
लातूर              ४,६१,९२०               ९९.६५
नांदेड              ३,९९,५१०               ९१.८९
एकूण             १४,००,८७०              ३१६.५५