पीएफ कार्यालयात ग्राहकांसाठी प्रवेश बंद

file photo
file photo

औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांच्या आधारे ईपीएफ ग्राहक, निवृत्तिवेतनधारक, जनतेच्या सदस्यांना पीएफच्या क्षेत्रीय कार्यालयात प्रवेशास पुढील सूचना येईपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अशी माहिती क्षेत्रीय पीएफ आयुक्त एम. एच. वारसी यांनी दिली. 

  बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वैयक्तिकरीत्या प्रवेशास प्रतिबंध करण्यात येत आहे. नोवेल कोरोना व्हायरसचा प्रसार (कोविड -१९) रोखण्यासाठी ११ कर्मचारी भविष्‍य निधी संघटनच्या विविध सेवा आता ऑनलाइन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यानुसार, कर्मचारी भविष्‍य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालय औरंगाबाद यांनी सर्वसाधारणपणे आणि विशेषत: ईपीएफ लाभार्थ्यांना खालील ऑनलाइन सुविधांचा वापर करून त्यांच्या स्वत:च्या हितासाठी कार्यालयात प्रत्यक्ष न येण्याचे आवाहन केले आहे. 

हे आहेत पर्याय 

  • - दावे दाखल करण्यासाठी: www.epfindia.gov.in मध्ये यूएएन पोर्टल/UMANG अ‍ॅप 
  • - जीवनप्रमान (जीवन प्रमाणपत्र) भरण्यासाठी: www.jeevanpramaan.gov.in 
  • - तक्रारी / शंका नोंदवण्यासाठी ईमेल आयडी वापरा. 
  • ro.aurangabad@epfindia.gov.in (विषय स्तंभात कृपया " तक्रारीचा उल्लेख करा)- 
  • - कोणत्याही शंका / तक्रारी असल्यास कृपया कार्यालयाशी ईमेलद्वारे संपर्क साधा 
  • (ro.aurangabad @epfindia.gov.in) किंवा खाली दिलेल्या फोन नंबर व टोल फ्री क्रमांक 
  • सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. 
  • फोन नंबर ०२४०-२४८५६०६, २४७३९७१, २४७३९७२, २४८७१५७, २४८७१५६, २४७०१७९, २४७५३५३. 
  • टोल फ्री क्रमांक: १८०० ११८००५ सदस्यांचे प्रश्न त्वरित सोडवले जातील आणि त्यांच्या ई-मेल आयडी / फोन नंबरद्वारे प्रत्युत्तर दिले जाईल, असेही श्री. वारसी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com