फडणवीसांनी भेट घेतली; बैठक नाही : भाजपचे स्पष्टीकरण

BJP did not meet : Shirish Borakar
BJP did not meet : Shirish Borakar

औरंगाबाद : मुंबईवरून नागपूरला वाहनाने निघालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी (ता. १३) औरंगाबादेत पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यादरम्यान कुठलीही बैठक झाली नाही, असे स्पष्टीकरण करण भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी केले.

श्री. बोराळकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुंबईहून नागपूरसाठी बाय रोड निघाल्याचे आम्हाला कळले. त्यानुसार आम्ही त्यांची औरंगाबाद वाळूज जवळ भेट घेतली. केवळ दोन ते अडीच मिनिटे त्यांच्याशी बोलणे झाले. वाहनातून ते आमच्याशी बोलले. सध्या कोण आहे तुम्ही कशाला आले, असे फडणवीस यांनी आम्हाला सांगितले. त्यावेळी तुम्ही जात असल्याचे कळले; त्यामुळे नमस्कार करायला आलो असल्याचे आम्ही त्याना सांगितले, अशी माहिती बोराळकर यांनी दिली.

श्री. फडणवीस म्हणाले, काळजी घ्या. कोरोनाा कंट्रोलमध्ये आणा. यासाठी भाजपकडून काय मदत करता येईल ती करा. मला नागपूरला मीटिंग असल्यामुळे निघावे लागेल असे सांगून ते नागपूरकडे रवाना झाले असल्याचेही श्री. बोराळकर यांनी सांगितले.
 
संबंधित बातमी - फडणवीसांनी घेतली गुप्त बैठक, मुंडे-खडसेंविरुद्ध नवा डाव? 
 
नेमके काय म्हणाले फडणवीस?
यावेळी उपस्थित असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, फडणवीस म्हणाले, कोरोना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय मदत करता येईल. ती मदत करा. 
मुंबईहून नागपूरकडे बाय कार निघाले असता औरंगाबादेत खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, अनिल मकरिये यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  यावेळी फडणवीस म्हणाले, सध्या कोरोना आहे. तुम्ही कशाला आला. औरंगाबाद येथील कोरोना कंट्रोलमध्ये आणा. दरम्यान, शहराध्यक्ष केणेकर यांची वाढलेली दाढी पाहून फडणवीस म्हणाले, संजू तू आता म्हातारा होत आहेस असे म्हणत त्यांची मस्करी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com