आता ‘आयकार्ड’शिवाय महाविद्यालयात प्रवेश मनाई

महाविद्यालयात बाहेरील मुले येऊ नये याबाबत खबरदारी घेतली जात आहे
College Student
College Studentsakal media

औरंगाबाद - गेल्या आठवड्यात शहरात एका विद्यार्थिनीचा ओढत नेऊन खून केल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण शहर हादरले. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून महाविद्यालय परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली. महाविद्यालयांकडूनही विद्यार्थ्यांचा गणवेश व आयकार्ड तपासूनच प्रवेश देण्यात येत आहे.

महाविद्यालयात बाहेरील मुले येऊ नये याबाबत खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर देवगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. त्यात एक महिला समिती नेमण्यात आली असून ही समिती महाविद्यालय परिसरात राऊंड मारत लक्ष ठेवणार आहे. तसेच कुठल्याही विद्यार्थिंनीची काही तक्रार असल्यास या समितीकडे ती मांडू शकेल, शिवाय विद्यार्थ्यांसाठी डिसिप्लिन कमिटी नेमली आहे.

तसेच नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात कोणी भेटण्यासाठी आले तर प्रवेशद्वारावरच त्याची पूर्ण चौकशी होऊनच आत प्रवेश दिला जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात चिप असलेले आयकार्डही विद्यार्थ्यांना देण्याचा विचार आहे, अशी माहिती उपप्राचार्य गायकवाड यांनी दिली. बैठकीस, प्राचार्य अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ. सी.एस. पाटील, डॉ. अनिल आर्दड, डॉ. दिलीप खैरनार, सुरेश लिपाने यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com