दुकानदारांवर कारवाई, जास्त वेळ दुकाने उघडी ठेवल्याने दंड

मास्क न लावणाऱ्या १३ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दहा हजार रूपये दंड वसूल करण्यात आला.
दुकानदारांवर कारवाई, जास्त वेळ दुकाने उघडी ठेवल्याने दंड

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : शहरातील (Tuljapur) दुकानदारांनी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवली म्हणून तीन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई गुरूवारी (ता.१३) करण्यात आली.कोरोना संसर्गामुळे (Corona) जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Collector Kaustubh Divegaonkar) यांच्या आदेशानुसार विहित कालावधीपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच काही दुकानदारांना समज देण्यात आली. मास्क न लावणाऱ्या १३ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दहा हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. मंगळवार पेठ भागातील श्री. बाळेश्वर टेक्सस्टाईल या दुकानदारास पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. (Osmanabad Latest News Action Against Shops In Tuljapur)

दुकानदारांवर कारवाई, जास्त वेळ दुकाने उघडी ठेवल्याने दंड
कांद्याला भाव मिळेना! शेतकरी झाला हाताश

तसेच आर्य चौक भागातील ओम मॅचवेल, तुळजाई लेडीज वेअर या दुकानदारांना प्रत्येकी एक हजार रूपये दंड करण्यात आला. शहरात विनाकारण फिरणाऱ्या पाच व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. ते निगेटिव्ह निघाल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले. मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी स्वतः ही कारवाई केली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, संतोष इंगळे, बापु रोचकरी, ज्ञानेश्वर टिंगरे, नागेश काळे, सज्जन गायकवाड, अण्णा पारधे, विश्वास मोटे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com