अंत्यसंस्कारासाठी दोन दिवसांची वेटींग; कोरोनाचे थैमान, नातेवाईक हतबल

कोरोनाचा आकडा जसा वाढत आहे, तसाच मृत्युचाही आकडा आता मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली आहे.
अंत्यसंस्कारासाठी दोन दिवसांची वेटींग; कोरोनाचे थैमान, नातेवाईक हतबल

उस्मानाबाद : कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला दोन ते तीन दिवस वेळ लागत आहे. तब्बल तेरा मृतदेहावर अंत्यसंस्कार होणे बाकी असल्याने नातेवाईकांवर मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ आली आहे. कोरोनाचा आकडा जसा वाढत आहे, तसाच मृत्युचाही आकडा आता मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह नगरपालिकेकडे सोपविले जातात. त्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यामार्फत मृताच्या नातेवाईकांच्या उपस्थित त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी प्रचंड वेळ लागत असल्याने प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासकीय रुग्णालयाकडून दुपारी बारापर्यंत जे मृत्यू झालेले आहे. त्यांचेच मृतदेह दिले जातात. त्यानंतर मृत्यू झालेल्यांना दुसऱ्या दिवशीच मृतदेह दिल्या जात असल्याने नातेवाईकांना प्रदिर्घ प्रतिक्षा करावी लागत आहे. एका बाजूला कोरोनाने घरातील लोक रुग्णालयात तर दुसरीकडे त्यातील एखादा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यसंस्कारालाही जाता आले नसल्याची अनेक उदाहरण सर्रास पाहायला मिळत आहेत. मृतदेहाची मृत्यूनंतर अशी हेळसांड होणार नाही यासाठी नगरपालिकेकडून काहीतरी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. विद्युतदाहिनीची सोय केल्यास ही समस्या काही प्रमाणात सुटू शकेल असे मत व्यक्त होत आहे.

शासकीय रुग्णालय केवळ सकाळीच बारा वाजेपर्यंतचे मृतदेह नगरपालिकेकडे सोपविले जात होते. मात्र त्यानंतर होणारे मृत्यू होणाऱ्या मृतदेहाची हेळसांड होत असल्याने आता संध्याकाळी पुन्हा मृतदेह देण्यास सुरुवात केली आहे.

- डॉ. इस्माईल मुल्ला

माझ्या प्रभागातील काल एक वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मदतीसाठी स्मशानभूमी मध्ये गेल्यानंतर अतिशय भयावह परिस्थिती पहायला मिळाली. तिथे अंत्यसंस्कार करायला जागा सुद्धा शिल्लक नव्हती. मसनजोगी अंत्यसंस्कार करुन पूर्णपणे थकून आजारी पडल्याचे दिसले. शेवटी काही सहकाऱ्यांना घेऊन स्वत: अंत्यसंस्काराची तयारी केली.

- अक्षय ढोबळे, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com