esakal | वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कळंब तालुक्याची धोक्याकडे वाटचाल, करवाईत एक पॉझिटीव्ह

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे शैक्षणिक वर्षावर होणार 'हा' मोठा परिणाम...!
वाढत्या कोरोनामुळे कळंब तालुक्याची धोक्याकडे वाटचाल, करवाईत एक पॉझिटीव्ह
sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कळंब तालुक्याची धोक्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कडक कारवाईची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. शहरात बिनधास्त, नाहक फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून प्रत्येकाची बुधवारी (ता.२१) रॅपीड टेस्ट करण्यात आली. यात विनाकारण फिरणाऱ्या २० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली असता त्यात एकजण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोनाबधित रुग्ण संख्या दररोज सरासरी ३० ते ९० च्या घरात वाढत आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी रुग्ण संख्या वाढीचे विक्रम दररोज मोडले जात आहेत. तालुक्यातील नागरिक मात्र, बिनधास्त फिरत आहेत. साखळी तोडण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करूनही नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने नाहक फिरणाऱ्यांविरुद्ध आता कडक कारवाई करून रॅपिड टेस्ट करण्याचा फंडा वापरण्यात येत आहे. कळंब तालुक्याला कोरोना संख्या वाढत असल्याने यातून सावरण्यासाठी आमदार कैलास घाडगे पाटील, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्याकडून शर्यतीचे प्रयत्न केले जात आहेत.

तालुक्यात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची संख्या ४१४ वर जाऊन पोचली आहे. ३१ मार्च ते २० एप्रिल या कालावधीत ८२६ नागरिक कोरोनाबाधित झाले असून यापैकी ४१२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णाला बेड वेळेवर मिळत नाही. बेड मिळाला तर व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मिळेल याची खात्री नाही. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक यांचा जीव टांगणीला लागतो हे माहीत असतानाही नागरिक खुशाल घरा बाहेर नाहक पडत आहेत ही चिंतेची बाब आहे.

नागरिक कोरोना घेऊन फिरतात बिनधास्त : कोरोनाचे संक्रमण तोडण्यासाठी शासन, प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पूर्वी सकाळी ७ ते २ वाजेपर्यत मार्केट सुरू होते. नंतर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यत अत्यावश्यक सेवा देणारी आस्थापना उघडी ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी नुकतेच दिले आहेत. तरीही कोणत्या ना कोणत्या बहाण्याने नागरिक रस्त्यावर येईचे टाळत नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून कडक करावाही करण्यासाठी प्रयत्न केले जात असून नाहक फिरणाऱ्याची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. बुधवारी केलेल्या २० टेस्टपैकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिक कोरोना घेऊन बिनधास्त फिरत असल्याचे समोर येत आहे.