Paithan Isarwadi Ashadhi wari
Paithan Isarwadi Ashadhi wari sakal

दिंडीतील भक्तांना मुस्लीम बांधवांकडून पंगत

इसारवाडी येथील नागरिकांचा समाजापुढे आदर्श : तीन वर्षांपासून परंपरा कायम

पैठण : धर्म, जात पंथाच्या भिंती ओलांडून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या दिंडीतील भाविकांना इसारवाडी (ता.पैठण) येथील मुस्लिम बांधवांकडून पंगत देण्यात येत असून तीन वर्षांपासून त्यांनी ही आपली परंपरा कायम राखली असून यातून त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

इसारवाडी या गावातील श्रीनाथ भजनी मंडळ पायी दिंडीव्दारे पैठण ते पंढरपूर असा प्रवास करतात. येथील दिंडीचे मंगळवारी (ता.२१) प्रस्थान होणार आहे. हे भजनी मंडळ गेल्या १७ वर्षापासून वारी करीत असून पायी दिंडीचे यंदाचे १८ वे वर्ष आहे. गत दोन वर्ष कोरोनामुळे वारीला खंड पडला होता. यंदाच्या दिंडी वारीचे नियोजन दिंडी प्रमुख भाऊसाहेब महाराज गुंड, कीर्तनकार आव्हाड महाराज, भागवताचार्य अंबादास केसभट, जगन्नाथ महाराज चाबुकस्वार यांनी केले आहे. या वारीत पंढरपूरला जाण्यासाठी ४० ते ५० पुरुष व महिला वारकऱ्यांचा सहभाग आता पर्यंत राहिला असून यंदा मात्र ७० ते ८० वारकऱ्यांचा सहभाग राहणार आहे.

या वारीच्या अन्नदानात गावातील मुस्लीम समाजाने सहकार्य करून खारीचा वाटा उचलला आहे. वारीचा १८ दिवसाचा प्रवास असून प्रत्येक मुक्कामी अन्नदात्यांकडून सोई सुविधेसह भोजन प्रसादाची व्यवस्था केली करण्यात येते. येथील मुस्लिम बांधवांनी दिंडीतील भाविकांच्या दोन पंगतीसाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या या निर्णयाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. यापुढेही ही परंपरा कायम राखणार असल्याचे मत मुस्लीम बांधवांनी व्यक्त केली आहे.

यांनी घेतला पुढाकार

वारीत जाणाऱ्या भाविकांच्या पंगतीसाठी मुस्लीम समाजाचे आयुब लतीफ शेख, इसाम अजित शेख, शाबुद्दीन अब्दुल शेख, हबीब अन्सार, गुलाब चॉँद शेख, चॉँद मधू पठाण, सलीम अब्दुल रहमान शेख, युनूस मौलाना शाह, बबू हुसेन शेख यांनी पुढाकार घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com