बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका

बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७२९ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका

बीड - राज्यात सगळीकडे कोविड रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यावरुन राजकारण सुरु झाले आहे. माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना बीडमध्ये रेमडेसिविरचा तुटवडा असून त्याकडे जातीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारला आलेल्या दोन लाखांपैकी बीडला ही पुरेसे व्हॅक्सिन मिळाले पाहिजे. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही तयार आहोत, अशी घणाघाती टीका मुंडे यांनी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ट्विट करुन केली आहे. पंकजा यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना बीडमधील कोरोना स्थितीवर पत्र लिहिले आहे.

पत्रात पंकजा मुंडे म्हणतात, बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७२९ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ३४ हजार ९८९ असली तरी त्यातील ३० हजार ४७८ रुग्ण बरे झाले आहेत. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे.

एकंदरीत बीडची चित्र मांडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आरोग्य मंत्री टोपे यांना याकडे जातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी केली. महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या दोन लाख लसींपैकी बीडला राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत. ही अतिशय खेदजनक बाब आहे. तथापि याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेसे व्हॅक्सिन उपलब्ध करुन द्यावेत व तशी व्यवस्था आपण करावी आणि संबंधित यंत्रणेला सूचित करावे ही विनंती, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com