‘ट्रान्सपोर्ट फॉर ऑल’चा पहिला टप्पा पास

आता दुसऱ्या टप्प्यासाठी औरंगाबाद महापालिका पात्र
Aurangabad
AurangabadSakal

औरंगाबाद - शहरातील सार्वजनिक वाहतुकीला सर्वांना परवडणारी, सुरक्षित व सोयीस्कर बनवण्यासाठी सुरू केलेल्या ‘ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंज’च्या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद महापालिकेने उत्कृष्ट कामगिरी करून दुसऱ्या टप्प्यात दाखल होण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र शासनाने दुसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी पात्र ठरलेल्या देशभरातील ४६ शहरांची सोमवारी (ता. सहा ) यादी प्रसिद्ध केली, यामध्ये औरंगाबाद शहराचा समावेश आहे.

सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहारमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या शहरांची यादी प्रसिद्ध केली. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचा एक उपक्रम म्हणून ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंज १५ एप्रिल २०२१ ला सुरूवात झाली. आयटीडीपी या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महापालिका प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीने ट्रान्सपोर्ट फॉर ऑल मोहिमेत त्यांच्या दिलेल्या निकषाप्रमाणे भाग घेतला. कोविड काळात जगभरात सार्वजनिक वाहतुकीला मोठा फटका बसला होता.

संयुक्त राष्ट्राचे शाश्वत विकासाचे लक्ष ११.२ नुसार २०३० पर्यंत सर्व नागरिकांना सुरक्षित, परवडणारी व सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे. ट्रान्सपोर्ट फॉर ऑल या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यांमध्ये औरंगाबाद ने ‘ट्रान्सपोर्ट फॉर ऑल टास्क फोर्स’ स्थापित केले व त्यानंतर सर्वेक्षणाद्वारे नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शहराच्या ५ मुख्य समस्या निवडल्या. त्यात रिक्षावाले, बस ड्रायव्हर व कंडक्टर ह्यांचे सुद्धा मत नोंदवण्यात आले. यात आलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी स्टार्टअपची मदत घेण्याबाबत विचार सुरू आहे. या चॅलेंजसाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे व स्मार्ट सिटी बसचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड, विश्लेषक सागर इंगळे व माध्यम विश्लेषक अर्पिता शरद हे कार्य करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com